चंद्रपुरातील पाणी पेटणार

By admin | Published: May 14, 2017 12:31 AM2017-05-14T00:31:22+5:302017-05-14T00:31:22+5:30

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

The water in the moonlight | चंद्रपुरातील पाणी पेटणार

चंद्रपुरातील पाणी पेटणार

Next

अनेक वॉर्डात टंचाई : सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी दंड थोपटले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाविरोधात दंड थोटपले आहे. अयोध्या नगर, हनुमान नगर, सुमित्रनगर, दत्त नगर, आदी विविध भागांत गेल्या पाच वर्षांपासून व्यवस्थित पाणी पोहोचत नाही. वडगाव, डॉ. आंबेडकर नगर, बाबुपेठ आदी भागातही पाण्याचा प्रश्न आहे. मनपाच्या नवीन पदाधिकाऱ्यांपुढे पाण्याचा पेच निर्माण झाला आहे.
तीन आठवड्यानंतर मान्सून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर शहरात शनिवारी मान्सूनपूर्व धारा बरसल्या आहेत. उन्हाळा संपायला आला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या मार्च महिन्यात सुमित्र नगर, हनुमान नगर, अयोध्या नगर येथील नागरिकांनी नळाचे पाणी मिळत नसल्याची तक्रार केली होती. गेल्या पाच वर्षांपासून पाणीपट्टी भरतो, तरी पाणी का मिळत नाही, असा टाहो नागरिकांनी फोडला होता. तसेच एकोरी वॉर्ड, भिवापूर, बाबुपेठ, डॉ. आंबेडकर नगर, इंडस्ट्रियल वॉर्ड, वडगाव आदी परिसरातही नियमित पाणीपुरवठा होत नाही.आता या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहेत. शहराच्या सर्वच भागात समान पातळीवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्याबाबत २०१३पासून तक्रारी करण्यात येत आहेत. चंद्रपूर शहराला मनपाने पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शनकडे आहे. या कंपनीच्या विरोधात सुमित्र नगर, महेश नगर येथील नागरिकांनी तक्रार केली.

सत्ताधारी नगरसेवक करणार उपोषण
नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी दे. गो. तुकूम प्रभागात येणाऱ्या विविध भागातील नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसल्याचे पत्र मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना दिले. त्यावर शहर अभियंता महेश बारई यांनी ८ मे रोजी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला तक्रारीचे निराकरण करण्याचे आदेश दिले. पत्र प्राप्त होताच या भागांमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्याप पाणी समस्या आहे. त्यामुळे नगरसेवक कासनगोट्टूवार यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

पाणी प्रश्नावर बसपा व शहर आघाडी आक्रमक
शहराच्या अनेक भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगून बसपा व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मनपाची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे केली आहे. वडगावसह विविव वॉर्डांमध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जटपुरा गेट प्रभागातील जलनगर वॉर्डात सुहाना शेख या दीड वर्षीय मुलीचा नालीत पडून मृत्यू झाला. बसपाचे गटनेते अनिल रामटेके, पितांबर कश्यप, बंटी परचाके आणि शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख आदींनी महापौरांची भेट घेऊन मागणी केली आहे.

Web Title: The water in the moonlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.