मिळेल त्या भांड्यात साठवावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:49 AM2019-04-14T00:49:48+5:302019-04-14T00:50:29+5:30

गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Water that needs to be stored in the bowl | मिळेल त्या भांड्यात साठवावे लागते पाणी

मिळेल त्या भांड्यात साठवावे लागते पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देचार्ली येथील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष : वेकोलिद्वारा टँकरने पाणी पुरवठा; मात्र प्रशासनाने लक्ष नाही

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप हालचालही केलेली नाही.
राजुरा तालुक्यातील चार्लीवासीयांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड प्रशासनाच्या नियोजनाला लाजविणारी आहे. राजुरा तालुक्यातील चार्ली - निर्ली परिसरात पाण्याचे मुबलक साठे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात याठिकाणी दरवर्षी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चार्ली या एक हजार १४० लोकसंख्येच्या गावातील बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने भर उन्हाळ्यात गावकºयांचा पाण्यासाठी केविलवाना संघर्ष सुरू झाला आहे.
येथील नागरिकांना गुंडभर पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली असताना तालुका प्रशासनाने गावकºयांना पाण्याची कुठलीही व्यवस्था करून दिलेली नाही. गावात पाण्याचा एवढा दुष्काळ सुरू असतानाही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गावाला भेट दिली नाही. चार्ली गावात नागरिकांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना तालुका प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, हे गावकºयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. चार्लीवासीयांचा पाण्यासाठी होणारा हाल लक्षात घेता गावकºयांनी अनेकदा वेकोलि प्रशासनाला पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टमधून गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात पाण्याचे टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. महिलांसह लहान मुले, आबाळवृद्धही गुंडभर पाण्यासाठी धडपड करीत असतात. घरातील मिळेल त्या भांड्यात टँकरमधून पाणी घेतात व साठवून ठेवतात. यासाठी वेकोलि प्रशासनाने गावकºयांना टँकरची तात्पुरती व्यवस्था करून दिली असली तरी एका टँकरवर नागरिकांची तहाण भागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने वा जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्यानुसार उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
भर उन्हाळ्यात चार्लीवासीयांचा पाण्यासाठी चाललेला संघर्ष प्रशासनाला दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. नागरिकांच्या नशिबी दिवसरात्र पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आल्यानंतरही तालुका प्रशासनाचे अधिकारी एवढे अनभिज्ञ कसे ? एकीकडे पाण्यासाठी गावकºयांचे हाल होत असताना गावाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अंधारल्या रात्रीही नागरिकांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे.

Web Title: Water that needs to be stored in the bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.