चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:23 AM2018-05-18T00:23:32+5:302018-05-18T00:23:32+5:30

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Water problem in Chuck gloss is serious | चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

Next
ठळक मुद्देपाण्यासाठी महिलांची पायपीट : गावातील टाकी शोभेची

लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावात दहा वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना अद्यापही नळाचे पाणी मिळत नसल्याने चकघोसरी वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
चकघोसरी येथे एक हजारच्या जवळपास लोकवस्ती असून गावात चार विहिरी व चार बोरवेल आहेत. मात्र काहींचे पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांची तहान भागवणारा हातपंप आठवडा भरापूर्वी बिघडला. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार केली. ग्रा.पं. सदस्यांना कळविले असता. मात्र हातपंप दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याऐवजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे.
चकघोसरी गावात अद्यापही नळ योजना पुर्णत्वास आलेली नाही. जवळपास दहा वर्षापूर्वी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावाकरिता असलेल्या योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून गावात २० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी उभारण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या आशेने नळ जोडणी केली. मात्र अल्पावधीतच पाणी पुरवठा ठप्प पडला. दहा वर्षे लोटूनही हा पाणी पुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
चकघोसरी गावाच्या सीमेवरुन अर्धा किमी अंतरावर उमा नदी वाहते. या नदीतून शेतकरी तीन किलोमिटर पर्यंत शेतीला पाणी करतात. तर चकघोसरी गावासाठी स्वतंत्र नळ योजना मंजूर करुन गावाच्या टाकीत पाणी का पोहचविले जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
गावताील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. यात नदी, नाल्याचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन गावकºयांची पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Water problem in Chuck gloss is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.