जिल्ह्यातील शेकडो बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:05 PM2018-11-28T22:05:37+5:302018-11-28T22:05:54+5:30

यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Water Resistance in Hundred Bonds in the District | जिल्ह्यातील शेकडो बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट

जिल्ह्यातील शेकडो बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट

Next
ठळक मुद्देपाण्याची पातळी घटल्याने जलसंकट : बहुतांश बंधाऱ्यांचे कामही अर्धवट

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवारसारखी सिंचनाच्या दृष्टीने शेतकºयांचे भले करणारी योजना अंमलात आणली. यापूर्वीही शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच नदी, नाले, तलाव, बंधाºयात पाणी नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने गावकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. शेतीला पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राजुरा तालुक्यात शेकडो बंधारे शासनाने बांधले आहेत. मात्र आजघडीला या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबसुद्धा उरला नाही. काही बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहून गेले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.
शासन बंधाऱ्यावर लाखो रूपये खर्च करीत असेल आणि त्या बंधाºयाचा नागरिकांना, संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळत नसेल तर बंधारे बांधून काय फायदा, असा प्रश्न आता जनमाणसात विचारला जात आहे. यंदा पाण्याची समस्या अधिकच बिकट बनली असून राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांवर आतपासूनच जलसंकट घोंगावत आहे.
बोअरवेलही आटल्या
कधी न आटणाऱ्या शेतातील बोअरवेल यंदा आटल्या आहेत. रब्बी हंगामातील हजारो हेक्टर शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. सिंचनाअभावी यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडणार आहे.

Web Title: Water Resistance in Hundred Bonds in the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.