अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:25+5:30

भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते.

Water revolution in four villages in just 15 thousand | अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

Next
ठळक मुद्देलोकसहभागाची फलश्रुती : शेतकऱ्यांना मिळते मुबलक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी खर्च केल्यानंतरही अनेक ठिकाणी पाणी साठवता आलो नाही. परंतु, लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या १५ हजारात भद्रावती तालुक्यातील चार गावांमध्ये जलक्रांती घडवून आणण्याची किमया करून दाखवली. शिरना नदीवर १५ फुट मातीचा बंधारा बांधल्यामुळे चार किलोमीटर परिसरात मुलबल पाणी उपलब्ध झाले. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील गावकऱ्यांप्रमाणे इच्छाशक्ती दाखविल्यास असे प्रयोग जिल्हाभरात यशस्वी होऊ शकतात.
भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते. मात्र, यावर्षी लोकसहभागातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पळसगाव, विसलोन, कुचना आणि नागलोन या कोळशाने व्याप्त गावांमध्ये जलक्रांती घडवून आणल्याची अनुभूती आली आहे. या गावांमधील शेतकरी अवघ्या १५ हजार रुपये व श्रमदानामुळे दुबार पेरणीसाठी उपयुक्त ठरले आहे. नंदोरीपासून विसलोन, पळसगाव, माजरी व नंतर वर्धा नदीला मिळणारी शिरना नदी पावसाळ्यात प्रवाहित असते.
खरीप व रब्बी हंगामात या नदीला पाणी राहत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडतात. मात्र, यावर्षी केवळ १५ हजार रूपये खर्च करून काही दिवसांपूर्वी शिरना नदीत मातीचा १५ ते २० फूट आडवा बंधारा टाकण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी राहात नसताना आता चार किलोमीटरपर्यंत पाणी साठविले आहे. पळसगाव येथे किसानपूत्र गटशेती योजनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र्र जीवतोडे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला असून चारही गावे जलयुक्त झाली आहे. या प्रयोगासाठी संदीप झाडे, प्रकाश निब्रड, परशराम डाहुले यांच्यासह गावकरी पुढे सरसावल्याने तिनही गावांतील जलसंकट कायमचे दूर झाले आहे.

जिल्ह्यातील पहिला प्रयोग
शेतकरी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसिंचनाचे प्रयोग केल्यास समस्या दूर होऊ शकता. त्यासाठी लोकसहभाचे तत्त्व महत्त्वाचे आहे. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधलेला हा बंधारा शासनाच्या योजनेसाठी पथदर्शी ठरू शकतो. त्यामुळे असे शाश्वत सिंचनाचे प्रयोग जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.

चंद्र्रपूर जिल्हा कोळशाने व्याप्त असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. वेकोलिच्या सीएसआर फंडातून लहान व मोठ्या नद्यांवरही बंधारे बांधणे गरजेचे आहे. पळसगाव व परिसरात आम्ही राबविलेला प्रयोग प्रत्येक गावात झाला तर जिल्ह्यात जलक्रांती होऊ शकते.
- नरेंद्र्र जीवतोडे,
जिल्हाध्यक्ष, किसानपूत्र
शेतकरी गटशेती योजना

Web Title: Water revolution in four villages in just 15 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.