कोरपना तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:20 AM2017-12-04T00:20:45+5:302017-12-04T00:21:09+5:30

यावर्षी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील धरण, नदी, नाले, ओढे यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येत आहे.

Water scarcity question in Korpana taluka on the anagram | कोरपना तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर

कोरपना तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही धरणे निम्म्यावर : उपाययोजना करणे आवश्यक

सतीश जमदाडे ।
आॅनलाईन लोकमत
आवारपूर : यावर्षी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील धरण, नदी, नाले, ओढे यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला समोर जाण्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुडम हे नावाजलेले धरणे आहेत. तालुक्यात पाउस कमी पडल्याने धरणाचा जलस्त्रोत साठा यावर्षी निम्मा झाला आहे. दरवर्षी या दोन्ही धरणामध्ये ८५% पाणीसाठा उपलब्ध असायचा. त्यामुळे नागरिकांना मुभलक पाणी मिळत होते. दरवेळी या कालावधीत अमलनाल्यामध्ये ८०% पाणीसाठा होता. यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाणी कमी पडल्याने धरणात २४% जलसाठा उपलब्ध आहे. तर पकडीगुडम धरणाची देखील हिच अवस्था असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाणी साठा म्हणजेच २३% टक्केधरणात पाणीसाठा उपलब्ध आहे.
महत्वाचे म्हणजे, या दोन्ही धरणातून अंदाजे ०.३० टक्के पाणीसाठा रोज कपात होत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर जानेवारी महिन्यापर्यंत १० ते १२ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे जलसंकट येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भविष्याचा वेद घेता आणि पाणी टंचाई लक्षात घेता लवकरच यावर नियोजन करुन कंपन्यांना जात असलेल्या पाण्यात कपात करण्यात येईल. तसे पत्र कंपनीला देण्यात येईल.
- हरीश गाडे
तहसीलदार कोरपना

Web Title: Water scarcity question in Korpana taluka on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.