पाणी पुरवठा विभागाला दुपारी १२ वाजेपर्यंंत कुलूप

By admin | Published: May 13, 2014 11:24 PM2014-05-13T23:24:14+5:302014-05-13T23:24:14+5:30

उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी मिळण्यासाठी नागरिक धावपळ करीत असतात. पाण्यासंदर्भात तक्रारी करण्याकरिता आज अनेक नागरिक न.प.च्या पाणी ..

The water supply department locked at 12 noon | पाणी पुरवठा विभागाला दुपारी १२ वाजेपर्यंंत कुलूप

पाणी पुरवठा विभागाला दुपारी १२ वाजेपर्यंंत कुलूप

Next

ंवरोरा : उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी मिळण्यासाठी नागरिक धावपळ करीत असतात. पाण्यासंदर्भात तक्रारी करण्याकरिता आज अनेक नागरिक न.प.च्या पाणी पुरवठा विभागात गेले असता दुपारी १२ वाजेपर्यंंत कार्यालयाला कुलूप लावलेले दिसून आले. कार्यालयाच उघडले गेले नसल्याने नागरिकांना तक्रार करता आल्या नाहीत. याचा फटका काही नगरसेवकांनाही बसला आहे.

वरोरा न.प. कार्यालयात पाणी पुरवठा विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे. कार्यालयाची वेळ सकाळी १0.३0 वाजता असते. परंतु सध्या उन्हाळा असल्यामुळे कार्यालय सकाळी उघडण्यात येत असते. सकाळी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्यात येते. शनिवार व रविवार असल्याने दोन्ही दिवस कार्यालय बंद होते. त्यामुळे सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने शहरातील पाण्यासंदर्भात तक्रारी घेऊन अनेक नागरिक सकाळी १0.३0 वाजेपासून कार्यालयाच्या बाहेर उभे झाले.

परंतु १२ वाजेपर्यंंत कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नाही. कार्यालय केव्हा उघडणार यांची माहितीही नागरिकांना मिळत नव्हती. मुख्याधिकारी विजय इंगोले यांच्याकडे भद्रावती व वरोरा पालिकेचा पदभार असल्याने ते सातत्याने व्यस्त असतात. अशातच पाणी पुरवठा विभाग आज दुपारी १२ वाजेपर्यंंत उघडण्यात आले नसल्याने संताप व्यक्त झाला. पालिकेत कर्मचारी आपल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे गरजेचे असते. परंतु पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कुलूप दुपारी १२ वाजेपर्यंंत उघडण्यात आले नाही.

यासंदर्भात पालिकेचे प्रभारी मुख्य लिपीक सुभाष बोस यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा विभागातील दोन कर्मचारी रजेवर असल्याचे अर्ज आहेत. परंतु इतर कर्मचार्‍यांचे अर्ज नाही. त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: The water supply department locked at 12 noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.