देवाडा नळयोजनेचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:20+5:302021-05-18T04:29:20+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा येथील नळयोजनेचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद ...
देवाडा : राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा येथील नळयोजनेचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.
कोरोनाच्या संकटात जिल्ह्यात संचारबंदी असताना गावखेड्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना महिलावर्गाना काही अंतरावर असलेल्या विहिरी व हातपंपावरून भर उन्हात पाणी आणण्याची पाळी आली आहे. येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. गावात पाणीटंचाईचे सावट पसरले असतानादेखील येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.