ऐन पावसाळ्यात नागभीडमधील वार्डात टँकरने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:33+5:302021-06-26T04:20:33+5:30
नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गालगतच शहराच्या मध्यभागी हा मोहोल्ला वसला आहे. जवळपास अडीचशे-तीनशे घरांची लोकवस्ती या मोहल्ल्यात आहे आणि ...
नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गालगतच शहराच्या मध्यभागी हा मोहोल्ला वसला आहे. जवळपास अडीचशे-तीनशे घरांची लोकवस्ती या मोहल्ल्यात आहे आणि शेतीशी संबंधित काम करणाऱ्यांची लोकसंख्या या मोहोल्ल्यात अधिक आहे. सुविधा म्हणून अनेकांनी घरी नगर परिषदेकडून नळ जोडणी घेतल्या आहेत.
सकाळी या मोहोल्ल्यात नळाला पाणी येत असले तरी फक्त ५ ते १० मिनिटांत नळाला येणारे पाणी बंद होते. नंतर थेंब थेंब पाणी सुरू असते. त्यामुळे मोहोल्ल्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, अशी माहिती या मोहोल्ल्यातील शांताराम रंधये या युवकाने 'लोकमत'शी बोलताना दिली.
बॉक्स
पाण्याचे अन्य स्रोत नाही
मोहोल्ल्यात पिण्याच्या पाण्याचे अन्य कोणतेही स्रोत नसल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण होत असल्याची माहिती आहे. येथील नागरिक मग रात्रीच्या वेळी किंवा सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील तपाळ योजनेच्या मुख्य पाइपलाइनवरील व्हाॅल्व्हवर लावण्यात आलेल्या नळजोडणीवरून पाणी भरून आपली गरज पूर्ण करीत होते, पण याठिकाणी काही तरी काम झाल्याने हे नळही बंद झाले, अशी माहिती आहे.