तीन महिन्यांपासून रेल्वेस्थानकावरील वॉटर वेंडिंग मशिन्स बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:40+5:302021-05-16T04:26:40+5:30

ऐन उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची गैरसोय बल्लारपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडद्वारे चालविण्यात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या ...

Water vending machines at the railway station have been closed for three months | तीन महिन्यांपासून रेल्वेस्थानकावरील वॉटर वेंडिंग मशिन्स बंद

तीन महिन्यांपासून रेल्वेस्थानकावरील वॉटर वेंडिंग मशिन्स बंद

Next

ऐन उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची गैरसोय

बल्लारपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडद्वारे चालविण्यात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या बल्लारशाह, चंद्रपूर रेल्वेस्थानकावरील स्वस्त व थंड पाण्याच्या वॉटर वेंडिंग मशिन्स मागील तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

यामुळे रेल्वे प्रवाशांना ज्यादा दराने पाणी विकत घ्यावे लागत असून, रेल्वे प्रशासनाने मशीन सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांना स्वच्छ आणि स्वस्त दरात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आयआरसीटीसीतर्फे मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर ठेका पद्धतीने वॉटर वेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. या मशीनमधून ५ रुपयांत एक लिटर पाणी तेही शुद्ध मिळत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा कल या मशीनचे पाणी घेण्यासाठी वाढला आहे. कारण स्टॉलवर एक लिटर पाणी १५ रुपयांस मिळते व वॉटर वेंडिंग मशीनचे पाणी ५ रुपयांत मिळते. यामुळे सुरुवातीपासूनच प्रवाशांची हे पाणी वापरण्यासाठी गर्दी होती. परंतु जेव्हापासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी ओसरली. त्यामुळे पाण्याची उचल कमी झाली व मशीन चालविणाऱ्यांनी हे मशीन बंद केले आहेत. दोन महिन्यांपासून बल्लारशाह स्थानकावरील फलाट क्र. ५ वरील या मशिन्स बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बल्लारशाह स्थानकावर दरवर्षी वॉटर कूलरच्या माध्यमातून थंड पाण्याची सोय असायची; परंतु यंदा तीही नाही. यामुळेही प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासन आयआरसीटीसीच्या माध्यमातून स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी ठेकेदाराला देऊन स्टॉल सुरू करते. परंतु त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे स्टॉल चालक मनमानी करतात व प्रवाशांची गैरसोय होते, याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवासी नसल्याने लाईट बिल, पाणी बिल व मशीनचे भाडे निघत नसल्यामुळे मशीन बंद असल्याचे ठेकेदाराने सांगितले.

कोट

काही रेल्वे प्रवासी टोल फ्री नंबरवर विचारणा करतात. परंतु तिकडून काहीच उत्तर येत नाही.

-जयकरणसिंग बजगोती, डीआरयूसीसी,सदस्य ,बल्लारपूर

Web Title: Water vending machines at the railway station have been closed for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.