बोरघाट उपसा सिंचनच्या कालव्यावरून पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:40+5:302021-09-02T04:59:40+5:30
बोरघाट सिंचन योजनेच्या पाणी पुरवठ्यामुळे गोवर्धन उप कालव्यांतर्गतची शेती सुजलाम्, सुफलाम् होण्याची आशा पल्लवित झाली. परंतु, कालव्याची स्थिती गंभीर ...
बोरघाट सिंचन योजनेच्या पाणी पुरवठ्यामुळे गोवर्धन उप कालव्यांतर्गतची शेती सुजलाम्, सुफलाम् होण्याची आशा पल्लवित झाली. परंतु, कालव्याची स्थिती गंभीर असल्याने टेलवरील शेतीपिकांना पाणी पुरवठा करणे कसरतीचे झाले आहे. कालव्यातील पाणी पातळी वाढवली की घोसरी गावाजवळ पाणी कालव्यावरून गावात घुसत असून, घरे पाण्याखाली येऊन धोकादायक असल्याची गंभीर स्थिती उद्भवत आहे. कालवा पाणी वाहून नेण्यास कमकुवत असून, पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने गोवर्धन उप कालव्यांतर्गत मौजा- घोसरी, नांदगाव, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी येथील धानपिके धोक्यात येण्याची शक्यता बळावलेली आहे. सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
मागील आठवड्यात बोरघाट उपसा सिंचनचे पाणी कालव्यावरून वाहत घोसरी गावातील काही घरांमध्ये शिरल्याने सुरेखा राऊत यांचे घर पडले, तर मालतीबाई निमगडे यांच्या घरासभोवताली पाण्याने वेढा दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला.
310821\img20210825152012.jpg
दिघोरी टेलवरील पिकांना पाणी पुरवठा करणे झाले कसरतीचे