नलफडी नाल्यात जलसाठा

By admin | Published: April 30, 2017 12:35 AM2017-04-30T00:35:57+5:302017-04-30T00:35:57+5:30

राजुरा आणि कोरपना तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची किमया होऊ लागली असून कडक उन्हात नलफडीच्या नाल्यात जलसाठा निर्माण करण्यात आला आहे.

Waterfowl in Nalphadi Nallah | नलफडी नाल्यात जलसाठा

नलफडी नाल्यात जलसाठा

Next

जलयुक्त शिवार : कडक उन्हाळ्यातही ओलावा
बी.यू. बोर्डेवार राजुरा
राजुरा आणि कोरपना तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची किमया होऊ लागली असून कडक उन्हात नलफडीच्या नाल्यात जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. या जलसाठ्यातून १५ गावांमध्ये सिंचन करण्याची सुविधा निर्माण होईल.
राजुरा - कोरपना तालुक्यात राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या निर्देशानुसार जलसाठा वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये टेभुर्वाही, सिर्सी, विरूर स्टेशन, खिर्डी, लक्कडकोट, सुमठाणा, साखरवाही, बोरगाव, कापणगाव, तुलाना, घोटा, देवाडा, वरूररोड, चिंचोली, मारडा या गावांचा समावेश आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत मूर्ती येथील शेतात क्लस्टर नाला खोलीकरण करण्यात आले आहे.
राजुरा तालुक्यात पाण्याची पातळी वाढली पाहिजे, यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून मजगी, नाला खोलीकरण, बोडी, ढाळीचे बांध धडाक्यात सुरू असून त्यातून ८०० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेततळे, नाली खोलीकरण, बोडीचे कामे प्रगतीपथावर असून राज्य शासनाने जलयुक्त अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिवारालगतच्या बंधाऱ्या जवळील नाल्याचे खोलीकरण करून शेती समतोल व गाळ वाहून जावू नये, यासाठी ढाळीचे बांध बांधण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये मजगी कार्यक्रमाद्वारे धानगोट तयार करून दिले जात आहे. शेतकऱ्याच्या शेतामधील जुन्या बोडीचे पुनर्जीवन करून नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असुन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नलफडी येथे शेतशिवारात नाला खोलीकरण करण्यात येत आहे. सोन्डो गावालगतच्या शेततळ्यात पाण्याचा साठा दिसत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्य शासन शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक शासकीय योजना कायान्वित होत आहेत. राजुरा तालुक्यातील सिर्सी येथे यादव आत्राम, लक्ष्मण पेंदोर, देवराव पेंदोर, जलमशाहा कन्नाके, बळीराम पेंदोर, भिमा तोडासाम, विठ्ठल कोवे या शेतकऱ्याचे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बोडीचे नुतनीकरण करून देण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी टी.जी. आडे, कृषी पर्यवेक्षक एस.एम. बोढे, आर.एच. माथारण, बी.एस. चव्हाण, पी.डब्ल्यू. मोहुर्ले, एस.एस. कदम, एस.एच. दातारकर, एम.आर. गंगथळे यांनी योजना प्रभावीपणे राबवून सिंचन क्षमता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्रात जलयुक्त शिवार योजना असो की, संघन सिंचन योजना असो. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी विहीर, तलाव, बोडी, मजगीच्या माध्यमातून राजुरा विधानसभा क्षेत्रात जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे.
- अ‍ॅड. संजय धोटे,
आमदार, राजुरा.

Web Title: Waterfowl in Nalphadi Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.