लाट ओसरली जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:20+5:302021-07-02T04:20:20+5:30

गुरुवारी बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, बल्लारपूर ३, मूल १, गोंडपिपरी १, राजुरा २, वरोरा ...

Wave Osarli district on the way to coronation | लाट ओसरली जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

लाट ओसरली जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

googlenewsNext

गुरुवारी बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, बल्लारपूर ३, मूल १, गोंडपिपरी १, राजुरा २, वरोरा १, जिवती १ व इतर ठिकाणच्या २ रुग्णांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आज राजुरा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. चंद्रपूर तालुका, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, चिमूर व कोरपना तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८४ हजार ६९२ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ९५४ झाली आहे. सध्या २०९ बाधितांवर उपचार सुरू आहे. ५ लाख ६१ हजार ८१३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ७४ हजार ४६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५२९ बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Wave Osarli district on the way to coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.