प्राचीन विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:48 PM2019-02-16T21:48:08+5:302019-02-16T21:48:46+5:30

चिमूर तालुक्यातील चिमूर ते मासळ (बु.) मार्गावरील तुकुम गावाजवळ सम्राट अशोककालिन पायऱ्यांची ऐतिहासिक विहिर प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही वरदान आहे. इतिहासाची साक्ष देणाºया विहिरीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्य तीव्र नाराजी पसरली.

On the way to the destruction of the ancient vines | प्राचीन विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर

प्राचीन विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : विहिरीचे जतन केल्यास जलसंकटावर मात करणे शक्य

प्रकाश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ (बु.) : चिमूर तालुक्यातील चिमूर ते मासळ (बु.) मार्गावरील तुकुम गावाजवळ सम्राट अशोककालिन पायऱ्यांची ऐतिहासिक विहिर प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही वरदान आहे. इतिहासाची साक्ष देणाºया विहिरीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्य तीव्र नाराजी पसरली.
चिमूर ते मासळ मार्गावर इसवी सनपूर्व सम्राट अशोक कालखंडात पायऱ्यांची विहिर बांधण्यात आली. मासळ परिसरात पूर्वी दळणवळणाची सुविधा नव्हती. त्यामुळे पायदळ, बैलगाडी अथवा सायकलने प्रवास करून जीवनावश्यक वस्तु व कार्यालयीन कामाकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाताना पायºयाच्या विहिरीजवळ विसावा घेणारे शेकडो साक्षीदार परिसरात आहेत. शेतकरी व बैलांची तहान भागविण्यासाठी पायºयांच्या विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. ही विहिर परिसरातील एकमेव ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा आहे. पायऱ्यांची विहिर म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. विहिरीचे बांधकाम सम्राट अशोकालिन पद्धतीची आहे. मासळ परिसर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचे कोलारा, मदनापूर अलीझंजा असे तीन प्रवेशद्वार आहेत. देश-विदेशातील पर्यटक व्याघ्र प्रकल्पात येतात. ऐतिहासिक पायºयांच्या विहिरीला भेट देतात. परंतु विहिरीकडे पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली. अस्वच्छतेमुळे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. पण, प्रशासनाला या विहिरीचे महत्त्व अजुनही कळले नाही. विहिरीमध्ये कचरा साचला. झुडपांमुळे विहिरीचे निरीक्षण करणे कठीण जाते. पुरातत्त्व विभागाने अभ्यासकांचे पथक पाठवून सर्वेक्षण करण्याची गरज आहे. यातून इतिहासाच्या तेजस्वी कालखंडावर प्रकाश पडू शकते.
लोकप्रतिनिधी उदासीन
प्राचीन पायऱ्यांच्या विहिरीचे जतन केल्यास जलसंकटावर मात करता येते. शिवाय, अभ्यासकांना इतिहासाचे दुवे शोधण्यास मदत होते. पुरातत्त्व विभागाकडे दुर्लक्ष असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासीन आहे.

Web Title: On the way to the destruction of the ancient vines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.