शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेकोलि कामगार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 05:00 AM2021-02-07T05:00:00+5:302021-02-07T05:00:02+5:30

शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी कोल इंडियाच्या मान्यता प्राप्त संघटनांनी शनिवारी कोळसा खाणीत जोरदार निदर्शने आणि द्वारसभा घेऊन सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा जोरदार विरोध नोंदविला.या भागातील कोळसा खाणीत शनिवारी सरकारचा निषेध करीत शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या कामगार संघटनांनी हे आंदोलन केले.

WCL workers on the streets in support of farmers | शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेकोलि कामगार रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेकोलि कामगार रस्त्यावर

Next
ठळक मुद्दे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ब्रह्मपुरीत सर्वपक्षीयांचा पाठींबा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतकºयांच्या समर्थनार्थ शनिवारी वरोरा, कोरपना व ब्रह्मपुरी येथे आंदोलन करण्यात आले. इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या कामगार संघटनांनी सास्ती, गोवरी, पोवनी, धोपटाळा, साखरी, गोवरी डीप, बल्लारपूर व सास्ती येथे द्वारसभा घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला.
कोरपनात कृषी कायद्याची होळी
कोरपना : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जनविकास सेनेने आज कोरपना-जिवती मार्गावर कृषी कायद्यांची प्रतिकात्मक होळी केली. आंदोलनात जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, सचिन पिंपळशेंडे, भिकू मेश्राम, सुनील बुटले,अरविंद आत्राम, किशोर मडावी, भोजीपाटील कुळमेथे, सत्यपाल किनाके, रवी पंधरे, दिनेश झाडे, कमलेश मेश्राम, विष्णू कुंभरे, तुषार निखाडे, आकाश लोडे, गितेश शेंडे, अक्षय येरगुडे, सचिन दडमल, वसंता कुंभरे, शंभू नैताम, गिरीधर तोडासे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ब्रह्मपुरीत रास्ता रोको
ब्रह्मपुरी : दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकूमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात ब्रह्मपुरी येथे शिवाजी चौकात दुपारी १२ वाजता विविध पक्ष व संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासू सौंदरकर, युवा नेते जगदीश पिलारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रेमलाल मेश्राम, आयटक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद राऊत, किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुधीर खेवले, अश्विन उपासे, लिलाधर वंजारी, राहुल भोयर, विनायक पारधी, महादेव बगमारे, विवेक नरुले, सुहास हजारे, पराग बनपूरकर, सागर हर्षे, गिरीधर गुरपुडे, दामोधर डांगे, दुधराम आकरे व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. 
 कृषी कायद्यांच्या  समर्थनार्थ रोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

वेकोलि कामगार संघटनांकडून केंद्र सरकारचा विरोध

राजुरा : शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी कोल इंडियाच्या मान्यता प्राप्त संघटनांनी शनिवारी कोळसा खाणीत जोरदार निदर्शने आणि द्वारसभा घेऊन सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा जोरदार विरोध नोंदविला.या भागातील कोळसा खाणीत शनिवारी सरकारचा निषेध करीत शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या कामगार संघटनांनी हे आंदोलन केले.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, गोवरी, पोवनी, धोपटाळा, साखरी, गोवरी डीप या ओपनकास्ट आणि बल्लारपूर व सास्ती या भूमिगत अशा आठही खाणीत सकाळी ८ वाजता कामगारांच्या द्वारसभा झाल्या. यावेळी सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे तातडीने रद्द करावे आणि कामगारां  च्या हिताचे असलेले ४४ कायदे रद्द करून त्यांचे फक्त चार कोड निर्माण करून संपवण्यात आलेल्या कामगार कायद्यातील परिवर्तन रद्द करून पूर्वीप्रमाणेच ४४ कायदे लागु करावे, अशी एकमुखी मागणी इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या चारही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी केली. यावेळी इंटक नेते आर.आर.यादव, अशोक चिवंडे, आर.एम.झुपाका, दिलीप कनकूलवार, विजय कानकाटे, रवी डाहुले, प्रभाकर सुचूवार, गणेश नाथे,राजेश्वर डेबिटवार यांची भाषणे झाली. संचालन दिनेश जावरे यांनी केले. यावेळी मधुकर ठाकरे,पुरुषोत्तम मोहुर्ले,नागेश मेदर,लोमेश लाडे,श्रीपूरम रामलू आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंदवन चाैकात रास्ता रोको
वरोरा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आनंदवन चौकातील वाहतूक काही वेळासाठी बंद पाडली. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यानंतर लगेच पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैदेत घेत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्वर टेंमुर्डे, विलास नेरकर, बंडू डाखरे, नगरसेवक प्रदीप बुराण, दिनेश मोहारे, तालुकाध्यक्ष विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, हसन दोसानी, बंडू खारकर, चंद्रकांत कुंभारे, राजू वरर्घने, बंडू भोगाडे, अतुल वानखेडे, दिलीप महल्ले,  रंजना पारशिवे, सुशीला तेलमोरे, दिलीप खैरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: WCL workers on the streets in support of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.