देशाच्या प्रगतीसाठी राजकारणात यावेच लागते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:54+5:302021-05-25T04:31:54+5:30
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेताना विद्यार्थिनी स्वामिनी कुचनकार. चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था ही नाजूक परिस्थितीमध्ये आहे. ...
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेताना विद्यार्थिनी स्वामिनी कुचनकार.
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था ही नाजूक परिस्थितीमध्ये आहे. ती सुधारण्यास आणखी काही दिवस लागतील, असे सांगून, देश तसेच राज्याच्या प्रगतीसाठी राजकारणात येणे गरजेचे आहे. विशेषत: तरुणांनीही यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माजी वित्तमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वणी येथील लायन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता चौथीमध्ये असलेली विद्यार्थिनी स्वामिनी प्रशांत कुचनकार हिने चंद्रपूर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रकट मुलाखत घेतली, यावेळी ते बोलत होते.
मु्ख्यमंत्री होण्यास आवडेल का, या प्रश्नाच्या उत्तरात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी, मुख्यमंत्री हे पद मी किंवा कुणी एक व्यक्ती ठरवत नसल्याचे सांगितले. तिने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी अत्यंत शांतपणे आणि समर्पक उत्तर दिले.
दरम्यान, आपणही चंद्रपूर, वणी तसेच नागपूर येथे शिक्षण घेतल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी तिला आवर्जून सांगितले.