सहाशे किलोमीटर सायकलने प्रवास करून घेतले महादेवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:04+5:302021-08-20T04:32:04+5:30

विकास शेडमाके पोंभुर्णा : तालुक्यातील दोन नद्यांच्या संगमावर असलेल्या जूनगाव येथील जगन्नाथ महाराज अशी ओळख असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने ...

We traveled six hundred kilometers by bicycle to see Mahadev | सहाशे किलोमीटर सायकलने प्रवास करून घेतले महादेवाचे दर्शन

सहाशे किलोमीटर सायकलने प्रवास करून घेतले महादेवाचे दर्शन

Next

विकास शेडमाके

पोंभुर्णा : तालुक्यातील दोन नद्यांच्या संगमावर असलेल्या जूनगाव येथील जगन्नाथ महाराज अशी ओळख असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने सहाशे किलोमीटरचा प्रवास करून महादेवाचे दर्शन घेतले.

जगन्नाथ चिंचोलकर, असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. आधुनिक काळात प्रवास करण्यासाठी दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध आहेत; परंतु संबंधित जगन्नाथ चिंचोलकर यांचा प्रवास हा सायकलने नियमित सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी सायकलने भावभक्तीने रामटेक, पंढरपूर, चंद्रपूर महाकाली यात्रा, महादेवाचे दर्शन घेतले आहे. विशेष म्हणजे ते ६५ वर्षांचे आहेत. याही वयात त्यांनी सायकलने प्रवास करून जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे मूळ गाव जूनगाव आहे. कोरोना काळ असो वा कोणताही काळ असो, सायकलने प्रवास करणे किती उपयुक्त आहे, हे ते नेहमी सांगत असतात.

190821\img_20210817_145909.jpg

सायकलचे प्रवास फोटो

Web Title: We traveled six hundred kilometers by bicycle to see Mahadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.