शहरातील भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:51 AM2018-04-25T00:51:49+5:302018-04-25T00:51:49+5:30

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागात पाणी टंचाई नित्याचीच बाब झाली. यावर उपाययोजनेकरिता मासिक सभेत निर्णय होऊनही प्रशासनाने अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरसेवकांनी रविवारपासून उपोषण सुरू केले.

We will take action against the severe water scarcity in the city | शहरातील भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना करणार

शहरातील भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना करणार

Next
ठळक मुद्देसभापतींचे आश्वासन : नगरसेवकांचे उपोषण सुटले

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागात पाणी टंचाई नित्याचीच बाब झाली. यावर उपाययोजनेकरिता मासिक सभेत निर्णय होऊनही प्रशासनाने अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरसेवकांनी रविवारपासून उपोषण सुरू केले. दरम्यान, पाणी पुरवठा सभापतींनी आश्वासन दिल्याने सोमवारी उपोषणाची सांगता झाली.
शहरातील पाणी पुरवठा समस्येबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी,नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापतींना नगरसेवकांनी निवेदन दिले होते. मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने नगरसेवकांनी उपोषण सुरू केले. नगर परिषद स्थापनेनंतरही नागरिकांच्या गरजा पूर्ण होत नाही. असा आरोप करून नगरसेवकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. शहरात पाणी टंचाई असताना कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नागरिकांचा नगरसेवकांवर रोष आहे. पाणी टंचाई तसेच कुपनलिका कायान्वित करावी यासाठी शुक्रवारी निवेदन दिले. रविवारपर्यंत समस्या सोडविली नाही तर सोमवारी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासन व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यात अपयश आल्याचा ठपका ठेऊन नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, पाणी पुरवठा सभापती उषा हिवरकर यांनी नगरसेवक काँग्रेस गटनेता अ. कदीर शेख, विनोद ढाकुणकर , उमेश हिंगे, गोपाल झाडे, अ‍ॅड. अरूण दुधनकर यांच्यशी चर्चा करून दोन दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.

Web Title: We will take action against the severe water scarcity in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.