बैलबंडीवरून निघाली लग्नाची वरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:28 PM2018-04-28T23:28:32+5:302018-04-28T23:28:32+5:30
विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्न खर्चात वाढ झाली आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्न खर्चात वाढ झाली आहे. मात्र राजुरा तालुक्यातील रामपूर येथील उध्दवराव चाफले यांनी आपला मुलगा गौरवची नवरदेवाची वरात चक्क बैलबंडीवरून काढल्याने या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पारंपरिक विवाह सोहळ्याचे दर्शन झाले. रामपूर ते राजुरा अशा या वरातीची परिसरात चांगलीच चर्चा झाली.
सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. रखरखते उन्ह अंगावर झेलत विवाह सोहळे मोठ्या गाजावाजात पार पडत आहे. लग्न म्हटले तर तीन - चार लाख रुपये सहज खर्च होतात. त्यात लग्नाची वरात न्यायला नवरदेवाकडून हायटेक चारचाकी वाहन सजवून वरात वाजतगाजत काढली जाते. मात्र आधुनिक परंपरेला फाटा देत रामपूर येथे उध्दवराव चाफले यांनी आपला मुलगा गौरवची वरात चक्क बैलबंडी, रेंगीतून काढली.
त्यामुळे हा विवाह सोहळा राजुरा शहरात व परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
लग्नसोहळ्यात काळानुरूप झालेले बदल, यामुळे लग्नाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र रामपूर येथील गौरवचा लग्नसोहळा याला अपवाद ठरला आहे.
बैलबंडी, रेंगी, सनईचा सप्तर्षी सूर असा लग्नसोहळ्याचा थाट पाहून वरात पाहणारे क्षणभर थांबायचे. मोबाईलच्या कॅमेराने बैलबंडीची ही वरात प्रत्येकजण टिपून घेत होता. ही वरात जेव्हा रामपूर येथून राजुरा शहरात पोहोचली, तेव्हा रस्त्याने जाणारे सर्वच जण अवाक झाले आणि कधी बैलबंडी, रेंगीची लग्न वरात न बघणाऱ्यांनी या विवाहसोहळ्यांची वरात कुतुहलाने बघून घेतली. या वरातीचे छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाल्याने या विवाह सोहळ्याची दिवसभर राजुरा शहरात व परिसरात चर्चा सुरू राहिली.
लग्नसोहळा ठरला आदर्श
लग्नसोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. महागड्या गाड्या, डेकोरेशन, डीजेच्या तालावर नाचणारे वºहाडी, असे सर्वसाधारण चित्र वरातीत दिसते. या साºया आधुनिक पद्धतीला बगल देत अत्यंत साध्या पद्धतीने रामपूर येथील उध्दव चाफले यांनी आयोजित केलेला हा विवाह सोहळा अनेकांसाठी आदर्श ठरला आहे.