ंसखी मंचतर्फे बुधवार, गुरूवारी हळदी-कुंकू

By admin | Published: January 20, 2015 12:04 AM2015-01-20T00:04:12+5:302015-01-20T00:04:12+5:30

लोकमत सखी मंच चंद्रपूरच्यावतीने २१ व २२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी महिलांना सन २०१५

On Wednesday, Thursdays by Haldi-Kunku | ंसखी मंचतर्फे बुधवार, गुरूवारी हळदी-कुंकू

ंसखी मंचतर्फे बुधवार, गुरूवारी हळदी-कुंकू

Next

चंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूरच्यावतीने २१ व २२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी महिलांना सन २०१५ साठी नवीन सभासद नोंदणी करण्याची सुविधा असणार आहे.
चंद्रपूर शहरातील विविध ठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. २१ जानेवारीला स्थानिक गजानन महाराज मंदिर परिसरात दुपारी १२ वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल.
२२ जानेवारीला स्थानिक रामनगरमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृहात दुपारी १२ वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजतापासून स्थानिक श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय रामाळा तलाव रोड जटपुरा गेट येथे हा कार्यक्रम घेण्यात येईल. यशस्वी स्पर्धकांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
यावेळी सर्व महिलांना कार्यक्रमात सहभाग घेता येणार असून होणाऱ्या विविध स्पर्धांमध्येही महिला भाग घेऊ शकतील. तसेच सभासद नोंदणीसुद्धा करू शकतील.
चंद्रपूर शहरातील सर्व महिलांनी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी खालील विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा.
भानापेठ-योगिता कुंटेवार (९४२३४९७९०१), पठाणपुरा-सुरेखा मडावी (९९२२११०७४८५), तुकूम- ज्योती दिनगलवार (९०९६४४०६७९), तुकूम- रेखा महाजन (९५९५३४००६७), सुमित्रानगर -पौर्णिमा डाहुले (७३८७५६११९१), अंचलेश्वर वार्ड-भानुमती बडवाईक, सिव्हील लाईन-सुचिता धकाते (९४२२६०७६९०), सिव्हील लाईन-सरीता मालू (९८५०४७१७०५), रामनगर पूजा पडोळे (८८०५९८५५९२, गजानन महाराज मंदिर परिसर नागपूर रोड-स्रेहा धानोरकर (७६२०३०५९०३), साईबाबा वॉर्ड-किरण बल्की (९८६०९०११२४), बाबूपेठ-अल्का देशमुख (८९५६०११०५५), दाताळा रोड-अंजू चिकटे (९८९०३०४५७३), दाताळा रोड-मंजुषा भीमनवार (९८८१७२८६८७), आनंद नगर दाताळा रोड ज्योती पडिशालवार (९४२०४४६६५१), गणेश मंदिर तुकूम-उज्वला वासेकर ८८०६९७६०४६, विठ्ठल मंदिर वार्ड भारती ठाकरे (९८५०५९६४६२), वनिता मुनघाटे (८८०६२२१०११), मूल रोड सोनाली घनमते (७२७६९७५५५९), बिंदीया वैैद्य (७७०९४५६२०१), समाधी वार्ड मंगला रुद्रपवार (९६८९६५३००८), बाजार वार्ड-मालती कुचनवार (९६६५४९४०४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On Wednesday, Thursdays by Haldi-Kunku

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.