चेन्नई-जोधपूर सुपर एक्स्प्रेसचे चंद्रपुरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:04 PM2017-09-04T23:04:55+5:302017-09-04T23:05:15+5:30

मागील अनेक वर्षापासून चंन्नई-जोधपूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबा देणात यावा, ...

Welcome to Chennai-Jodhpur Super Express at Chandrapur | चेन्नई-जोधपूर सुपर एक्स्प्रेसचे चंद्रपुरात स्वागत

चेन्नई-जोधपूर सुपर एक्स्प्रेसचे चंद्रपुरात स्वागत

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांच्या प्रयत्नाला यश : लोको पायलटचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक वर्षापासून चंन्नई-जोधपूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबा देणात यावा, अशी मागणी रेल सुविधा संघर्ष समिती तसेच चंद्रपूर महानगरातील विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे करण्यात येत होती. या बहुप्रतिक्षीत मागणीच्या अनुशंगाने ना. अहीर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर अखेर चेन्नई-जोधपूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसला चंद्रपूर येथील रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला. यावेळी रेल्वेचे विविध संघटनांद्वारे रेल्वेचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित रेल्वे प्रवासी व नागरिकांनी रेल्वेचे लोको पायलट यांचा शाल व पुष्पगुच्छ, मिठाई देऊन स्वागत केले.
यावेळी चंद्रपूर महानगराच्या महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फु लझेले, चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे रमणीक भाई चव्हाण, दामोदरलाल मंत्री, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. मंगेश गुलवाडे, रवी गुरूनुले, राजेंद्र तिवारी, दिनेश बजाज, रामजीवन परमार, रमेश बोथरा, महावीर मंत्री, अशोक रोहरा, राजेश सादरानी, जुगल सोनानी, अनिस दिक्षित, मुकूंद गांधी, प्रभाकर मंत्री, श्रवण मंत्री, हनुमान बजाज,बरेश लेखवानी, चंदू बजाज, सुनिल खोरिया,कैलाश सोमानी, सुरेश गुप्ता, अनिल राठी, हरीश भट्टड, अरूण माहेश्वरी, गौतम यादव, प्रवीण नथवाणी, अमीतभाई शरीफ, दिलीप पामपट्टीवार, रामानुज आसोपा, श्रीराम तोष्णीवाल, रामलाल सिंह, सेनसाहब, गिरीश गुप्ता, सुरेश यादव, उमाटे आदी उपस्थित होते.
चेन्नई-जोधपूर मार्गावर चालणाºया गाडीला थांबा मिळाल्यामुळे उपस्थित रेल्वे प्रवासी व विविध संघटनांनी रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने रेल्वेचा थांबा मिळाल्याने रेल्वे प्रवाशांना सोईचे झाले आह.

Web Title: Welcome to Chennai-Jodhpur Super Express at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.