केरला एक्सप्रेसचे चंद्रपूर स्थानकावर स्वागत
By admin | Published: November 24, 2015 01:11 AM2015-11-24T01:11:50+5:302015-11-24T01:11:50+5:30
केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर येथे त्रिवेंद्रम-नवी दिल्ली-केरला एक्सप्रेसचा
चंद्रपूर : केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर येथे त्रिवेंद्रम-नवी दिल्ली-केरला एक्सप्रेसचा अधिकृत थांबा मंजूर झाला. सोमवारी सायंकाळी ५.२६ वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर या गाडीचे आगमन होताच ना. हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थित चंद्रपूर शहरातील रेल्वे सुविधा संघर्ष समिती, चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असो. बल्लारशा, केरला समाज समिती, अयप्पा सेवा संघ व महानगरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो रेल्वे प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले.
यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते तसेच रेल्वे यात्री संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या लोको पायलटचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, मंडल रेल प्रबंधक मध्य रेल्वे नागपूरचे डी.आर.एम. श्री. सिंह, सिनीयर डीसीएम के.के. मिश्रा, डीसीएम एस.के. दास, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, चंद्रपूर रेल्वे अधीक्षक रामपला सिंह, कमर्शियल मॅनेजर एस. शर्मा, मनपा गट नेते अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेश मून, सुभाष कासनगोट्टूवार, मनपा झोन सभापती अंजली घोटेकर, प्रा.ज्योती भुते, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे रमणीकभाई चव्हाण, दामोदर मंत्री, रमाकांत देवडा, डॉ.रमेश बोथरा, जगदीश जाधवानी, अशोक मेहरा, दिनेश बजाज, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते, डॉ.एम.जे. खान, डॉ.ए.पी. पिल्लई, डॉ.गोपाल मुंधडा, डॉ.रितेश दिक्षीत, डॉ.मंगेश गुलवाडे, डॉ.भूपेश भलमे, सदानंद त्री, सी.ए. हर्षवर्धन सिंघवी, श्रीनिवास सुंचूवार, केरला संघाचे अध्यक्ष जॉर्ज कुट्टी, टी.सी. राजु, पप्पन नायर, राजेंद्र अडपेवार, मोहन चौधरी, राहुल सराफ, राजु घरोटे, शेख जुम्मन रिझवी, रघुविर अहीर आदी उपस्थित होते. केरला एक्सप्रेसच्या थांब्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)