पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:22 AM2017-10-22T00:22:31+5:302017-10-22T00:22:41+5:30

लोकांची अत्यावश्यक मागणी पूर्ण होऊन, दीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे- काजीपेठ ही रेल्वे एक्स्प्रेस शनिवारपासून सुरु झाली आहे. सध्या ही साप्ताहिक असून येत्या काही दिवसात आठवड्यातून तीनदा तर वर्षभरानंतर प्रतिदिन धावणार.

Welcome to the Pune-Kazipet Express at Chandrapur | पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत

पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : काही दिवसांत रेल्वे नियमित धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : लोकांची अत्यावश्यक मागणी पूर्ण होऊन, दीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे- काजीपेठ ही रेल्वे एक्स्प्रेस शनिवारपासून सुरु झाली आहे. सध्या ही साप्ताहिक असून येत्या काही दिवसात आठवड्यातून तीनदा तर वर्षभरानंतर प्रतिदिन धावणार. त्याकरिता कसोशीने प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. तत्पूर्वी पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचे बल्लारपूर आणि वरोरा रेल्वेस्थानकात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पुणे- काजीपेठ ही सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरु झाली आहे. तिचे येथे प्रथम आगमन आज दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी झाले. ना. हंसराज अहीर हे याच गाडीने चंद्रपूरहून येथे पोहचलेत. या गाडीच्या स्वागताकरिता चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनने रेल्वे फलाटावर मोठे मंच उभे केले होते. मंचावर ना. हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिष शर्मा, आमदार बंटी भागडिया, न.प. उपाध्यक्ष मिना चौधरी, रेणुका दुधे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, रेल्वेचे प्रबंधक अजय डैनियल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ही रेल्वेगाडी सुरु व्हावी, अशी गेल्या १७-१८ वर्षापासून मागणी होती. शेवटी, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या मागणीकडे जातीने लक्ष ही गाडी ऐन दिवाळीला सुरु केली.
रेल्वेबाबतच्या ज्या काही समस्या आहेत. त्या सर्व लवकर सोडविण्यात येतील, असे ना. अहीर म्हणाले. यावेळी इतर पाहुण्यांचीही भाषणे झालीत. संचालन रेल्वे यात्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार तर आभार प्रदर्शन शंकर बुद्धार्थी यांनी केले.

Web Title: Welcome to the Pune-Kazipet Express at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.