पुणे-काजीपेठ रेल्वेगाडीचे वरोºयात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:32 PM2017-10-22T23:32:08+5:302017-10-22T23:32:19+5:30
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाºया पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन होताच शहरवासींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा: अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाºया पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन होताच शहरवासींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
२० आॅक्टोबरला पुण्यावरुन पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडी निघाली. २१ आॅक्टोबरला ही रेल्वेगाडी वरोरा रेल्वे स्थानकावर दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोहचली वरोरा रेल्वेस्थानकावर माजी पालकमंत्री संजय देवतळे, वणीचे आमदार संजीव रेड्डी, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, बोदकुलवार, भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. भगवान गायकवाड, नगरसेविका सुनिता काकडे, सूवर्ण रेखा पाटील, विजय मोकाशी, राजेंद्र लडके, सुरेश महाजन, ओमप्रकाश मांडवकर, राजीव दोडके, प्रवासी मित्र संघटनेचे राजेंद्र मर्दाने आदींनी पायलटचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी रेल्वेगाडीचे पुजन केल्यानंतर ही गाडी काजीपेठकडे रवाना झाली.