गुलाब पुष्प देऊन केले स्वागत

By admin | Published: January 23, 2015 12:29 AM2015-01-23T00:29:02+5:302015-01-23T00:29:02+5:30

जंगलातील रस्त्यावरील बोर्डवर असलेले प्राणी काय सांगतो, स्पीडमध्ये वाहन असताना काय करायचे, कारमध्ये सिटबेल्ट लावला नाही तर काय होते असे एक नाही तर अनेक प्रश्न.. उत्तर ...

Welcome to the Rose Flower | गुलाब पुष्प देऊन केले स्वागत

गुलाब पुष्प देऊन केले स्वागत

Next

चंद्रपूर : जंगलातील रस्त्यावरील बोर्डवर असलेले प्राणी काय सांगतो, स्पीडमध्ये वाहन असताना काय करायचे, कारमध्ये सिटबेल्ट लावला नाही तर काय होते असे एक नाही तर अनेक प्रश्न.. उत्तर देणाऱ्याला तत्काळ बक्षिस असा अनोखा कार्यक्रम आज शहरातील नागरिकांना कार्नरकार्नरवर बघायला मिळाला.
औचित्य होते रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे. वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षकर पुंडलिक सपकाळे यांच्या संकल्पनेतून अंमलात आणलेल्या या कार्यक्रमाचे शहरातील नागरिकांनी भरभरून कौतूक केले. या कार्यक्रमातून वाहतूकीसंदर्भात जनजागृती आणि अनेकांच्या ज्ञानात भरही पडली.
दिवसेंदिवस रस्ता अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यासाठी वाहन चालक जबाबदार असतो. नियमानुसार वाहन न चालविल्यास स्वत:चे आणि दुसऱ्याचे कसे नुकसान होते. अपघात कसे टाळता येईल, अपघात झाल्यास काय करायचे, वाहन चालकांना वाहतुकीची नियम कळावे, वाहन चालविताना कोणती काळजी घेतली पाहिजे, वळण रस्त्यावर काय करावे, स्पीडमध्येवाहन असताना अचानक थांबवायचे असल्यास वाहनचालकाने कशी समयसुचकता दाखवावी आदींची माहिती देण्यात आली. एवढेच नाही तर वाहनधारकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तर देणाऱ्यांना गुलाब पुष्प तथा बक्षिसही देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Welcome to the Rose Flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.