तिरूनेलवेली-बिलासपूर एक्स्प्रेसचे चंद्रपुरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:41 PM2019-02-05T22:41:32+5:302019-02-05T22:42:51+5:30
केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा खासदार हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच थांबा मंजूर झालेल्या तिरूनेलवेली-बिलासपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच मुनारगुडी-भगत की कोठी, बिलासपूर- तिरूनेवली या गाड्यांचे अनुक्रमे ४ व ५ फेबु्रवारी रोजी शेकडो चंद्रपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.
चंद्रपूर : केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा खासदार हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच थांबा मंजूर झालेल्या तिरूनेलवेली-बिलासपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच मुनारगुडी-भगत की कोठी, बिलासपूर- तिरूनेवली या गाड्यांचे अनुक्रमे ४ व ५ फेबु्रवारी रोजी शेकडो चंद्रपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.
ना. हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार ४ फेबु्रवारी रोजी रेल्वे क्रमांक २२६२० तिरूनेलवेली -बिलासपूर ही गाडी चंद्रपूर स्थानकात दुपारी १२ वाजता पोहोचताच या गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपुकरांनी, रेल्वे प्रवाशांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या गाडीचे चालक, गार्डचे स्वागत केले. चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा नेते विजय राऊत, भाजपाचे जिल्हा महासचिव राहुल सराफ, झोनल रेल्वेचे सदस्य दामोदर मंत्री, रेल सुविधा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमणीकभाई चव्हाण, रमाकांत देवाडा, मनोहर टहेलियांनी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नागपूर रेल्वेचे वरिष्ठ डिसीएम के.के.मिश्रा, अतिरिक्त मंडल रेल्वे व्यवस्थापक एन.के. भंडारी, सचिन पाटील, ए. पी. सिंग, स्टेशन व्यवस्थापक एस. पी. सिंग, वाणिज्य निरीक्षक के. के. सेन, आरपीएफचे इन्चार्च एस. एस. ठाकूर आदींचा शाल व पुष्पगुच्छ देवून याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती, चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चंद्रपूरकर नगारिकांनी ट्रेन नं. १८५०२ गांधीधाम विशाखापट्टनम एक्सप्रेस रात्री १०.०७ वाजता चंद्रपूर स्थानकात येताच तिचेही उत्स्फुर्तपणे स्वागत केले. ५ फेबु्रवारी रोजी दुपारी १२.०० वाजता चंद्रपूर स्थानकात मुनारगडी ते भगत की कोठी या गाडीचे आगमन होताच रेल्वेच्या चालक, गार्डचे उपस्थितांनी स्वागत केले.
या रेल्वे गाड्यांच्या स्वागतासाठी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील उपस्थितांमध्ये महावी मंत्री, दिनेश बजाज, अनिल दीक्षित, डॉ. भुपेश भलमे, मधुसुदन रूंगठा, नरेश लेखवानी, प्रभाकर मंत्री, अशोक रोहरा, पूनम तिवारी, सुनील लाहोटी, नरेंद्र सोनी, पप्पु जाधवानी, प्रदीप नवाल उपस्थित होते.