ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचे स्वागत

By admin | Published: June 25, 2017 12:42 AM2017-06-25T00:42:47+5:302017-06-25T00:42:47+5:30

महाराष्ट्र सरकारच्या वतीने १ ते ७ जुलैपर्यंत वृक्षदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

Welcoming the Greenland Organization's Treefront | ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचे स्वागत

ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनच्या वृक्षदिंडीचे स्वागत

Next

अनिल सोले : प्रत्येक कुटुंबाने पाच झाडे लावावी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : महाराष्ट्र सरकारच्या वतीने १ ते ७ जुलैपर्यंत वृक्षदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गोंडपिपरी येथे आ. प्रा. अनिल सोले व राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांच्या नेतृत्वात वृक्षदिंडी काढून शहरातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे सतीश धोटे, पं.स. सभापती दीपक सातपुते, उपसभापती मनीष वासमवार, गोंडपिपरीचे नगराध्यक्ष संजय झाडे, भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे, उपनगराध्यक्ष चेतन गौर, भाजपा महामंत्री रवी पावडे, सुरेश धोटे, अश्विन कुसनाके, बबली मेश्राम, विजय फडणवीस, किशोर पाटील, तहसीलदार किशोर येडणे, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहितकर, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आ. प्रा. अनिल सोले म्हणाले की, वृक्षारोपण उत्सव किंवा उपक्रम नसून ती प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, पर्जन्यमानावर झालेला विपरित परिणाम आदी बाबींच्या संकटातून सजीव सृटीला वाचविण्याठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्याकरिता राज्य व केंद्र सरकारने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेतूत: प्रयत्न चालविले आहे. प्रत्येक कार्य शासन व प्रशासनानेच केले पाहिजे, अशी भावना न बाळगता प्रत्येक कुटुंबाने किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प केल्यास वृक्षारोपणाचे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे. पर्यायाने या उपक्रमातून मानवी जीवनास वरदान ठरणारे कार्य आपल्या हातून घडू शकते. गोंडपिपरी या गावाचे नाव वृक्षारोपणामुळे प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले असलयाचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रीनअर्थ आॅर्गनायझेशनने भरीव योगदान देतानाच जनजागृतीचेही कार्य पार पाडले. पंचायत समिती पटांगणात तसेच नगरपंचायत जवळ प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षदिंडीमध्ये गोंडपिपरीवासीय नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या वृक्षदिंडीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. गतवर्षी लावण्यात आलेल्या झाडांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला.

Web Title: Welcoming the Greenland Organization's Treefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.