वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे जंगलात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:41 AM2018-11-30T00:41:52+5:302018-11-30T00:42:11+5:30

आवळगाव-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील २० गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तिघांना वाघाने ठार केले. मात्र, वनविभागाने पिंजरे लावण्यापलिकडे काहीच केले नाही.

For the welfare of Wagh, keep the villagers in the forest | वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे जंगलात धरणे

वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे जंगलात धरणे

Next
ठळक मुद्देवांद्रा फाट्यावर धरणे : महिलांची लक्षणीय उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : आवळगाव-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील २० गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तिघांना वाघाने ठार केले. मात्र, वनविभागाने पिंजरे लावण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी वांद्रा फाट्याजवळ असलेल्या जंगलात धरणे आंदोलन केले. २० गावातील नागरिक यात सहभागी झाले. त्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
बरडकिन्ही, चिचगाव, डोर्ली, वांद्रा, आक्सापूर, पवनपार, बेलगाव, मूरपार, कळमगाव, सायगाव, कोसंबी, भूज, पद्मापूर, आवळगाव, हळदा, बोडदा, मुडझा, बल्लारपूर या गावात गेल्या एक-दीड महिन्यापासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. वांद्रा येथील जय धंदरे यांच्यावर वाघाने हल्ला करून जमखी केले. चिचगाव येथील ऐश्वर्या अलोणे हिच्या घरात शिरुन बिबट्याने हल्ला केला.
देऊळगाव येथील मिथून नामक युवकही जखमी झाला होता. मूरपार येथील साहील अमोल सालोरकर या आठ वर्षीय बालकावर वाघाने हल्ला करून ठार केले. पवनपार येथील शालू डोंगरवार या महिलेवरही वाघाने हल्ला करून ठार केले. रविवारी खुशी ठाकरे या सहा वर्षीय मुलीसही वाघाने ठार केले. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. मात्र, वनविभागाने अजूनही उपाययोजना केल्या नाही. वनविभागाने धुमाकूळ घालणाºया वाघ, बिबट्याचा बंदोबस्त करावा, यासह अन्य मागण्यांना घेवून जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर कायरकर, मोरेश्वर झोडे, रूपेश बांदोले, प्रशांत चिमूरकर, विलास विखार, मंगला लोनबले, किशोर राऊत, प्रमोद मोटघरे, छत्रपती सुरपाम यांच्यासह २० गावातील नागरिक उपस्थित होते.
वाघांचा बंदोबस्त करावा, वाघ, बिबट्यांना दुसरीकडे हलवावे, वाघाची नसबंदी करावी, वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयातील सदस्यांना नोकरी द्यावी, वडधा येथील नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना दिले.

Web Title: For the welfare of Wagh, keep the villagers in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ