काय झाडी, काय डोंगर, सोमनाथ धबधबा...एकदम ओक्केच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 12:23 PM2022-07-12T12:23:00+5:302022-07-12T12:25:04+5:30

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहत असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत असतानाचे चित्र बघायला मिळाले.

What a bush, what a mountain, Somnath waterfall ... all right! | काय झाडी, काय डोंगर, सोमनाथ धबधबा...एकदम ओक्केच !

काय झाडी, काय डोंगर, सोमनाथ धबधबा...एकदम ओक्केच !

googlenewsNext
ठळक मुद्देधबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढतेय

धनराज रामटेके

मूल (चंद्रपूर) : तालुक्यातील सोमनाथ प्रकल्प स्वर्गीय बाबा आमटे यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी निसर्गाने व हिरव्यागार वनाने नटलेला सोमनाथ धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक वाहत असणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. हे सौंदर्य बघूनच आलेल्या पर्यटकांच्या मुखातून ‘काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा’ असे उद्गार बाहेर पडत असताना दिसत होते.

मूल पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनाथ येथे आमटे फार्म आहे. या ठिकाणी अनेक कुष्ठरोगी नागरिकांना आमटे कुटुंबीयांनी आसरा दिलेला आहे. सोमनाथ येथे एक मंदिर आहे. त्याला लागूनच डोंगर दरीतून वाहणारा एक धबधबा आहे. प्रत्येक पावसाळ्यात धबधबा ओसंडून वाहत असतो. हाच धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा असून या ठिकाणी येणारे पर्यटक आनंद लुटत असतात. मंदिराच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. सोमनाथ बफर झोन क्षेत्रांअंतर्गत येत असल्याने आसपास वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी हिरवीगार वनराई, डोंगर, धबधबा असल्याने पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहत असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत असतानाचे चित्र बघायला मिळाले. मागील अनेक महिन्यांपासून मूल येथील गौरव शामकुळे आणि त्यांचे सहकारी मित्र स्वच्छता मित्र म्हणून सोमनाथ येथील परिसराची दररोज स्वच्छता करीत असल्याने या ठिकाणी असलेला स्वच्छ परिसर येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधत आहे.

Web Title: What a bush, what a mountain, Somnath waterfall ... all right!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.