राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 02:18 PM2024-06-29T14:18:32+5:302024-06-29T14:28:42+5:30
Chandrapur : संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांच्या वाट्याला काहीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महायुती सरकारकडून अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या होत्या, संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांच्या वाट्याला काही मिळाले नाही. मात्र, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झालेल्यांना भरपाईच्या रकमेत मोठी वाढ केल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर काँग्रेसच्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली.
अशी मिळेल आता नुकसान भरपाई
ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. वन विभागाकडून प्रतिबंधित उपाययोजना केल्या जातात. मात्र, अजूनही या घटनांना आळा बसला नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याच्या सर्वाधिक घटना चंद्रपूर जिल्ह्यातच घडत आहेत. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच नुकसान भरपाई वाढविण्यात आली आहे.
मदतपात्र शेतकरीच जिल्ह्यात अत्यल्प
■ नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै २०२२' पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पण, चुकीच्या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील मदतपात्र शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.
■ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित राज्यातील २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटींच्या मदतीची तरतूद करण्यात आली. मात्र, यातही जिल्ह्यातील शेतक- रीसंख्या कमी आहे.
१५ महसूल मंडळातील आशा पल्लवित
■ नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा आता दोनऐवजी तीन हेक्टर झाली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येईल.
■ खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यांत दुष्काळ तर १ हजार २१ महसूल 3 मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू केल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नवीन विस्तारीत चंद्रपूरची उपेक्षाच
सिंचन, पेसा ग्रामपंचायती, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग, कृषिपूरक उद्योग, शेतकरी कृषी कंपन्या, बेरोजगार व महिलांसाठी स्वयंरोजगार, अनु, जाती, जमाती, ओबीसी व भटक्या जमातीच्या उत्थानासाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या प्रकल्पांना व योजनांसाठी अर्थसंकल्पात काही मिळाले नाही. नवीन विस्तारित चंद्रपूरचीही उपेक्षा झाली आहे.
२० लाखांवरून २५ लाख
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास २० लाखांवरून आता २५ लाखांची मदत मिळेल. कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयां- वरून ७ लाख ५० हजार, गंभीर जखमीला १ लाख २५ हजारां- वरून ५ लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास २० हजारांवरून ५० हजार रुपये अशी वाढ झाली. पिकांच्या नुकसान भरपा- ईतील देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजारांरून ५० हजारांची वाढ झाली आहे