हे काय ?, पं.स.चे कार्यालयच घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 05:00 AM2022-06-10T05:00:00+5:302022-06-10T05:00:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही : तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत, पंचायत समिती कार्यालय परिसरात विविध विभागाचे कार्यालय तसेच सभापती, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत, पंचायत समिती कार्यालय परिसरात विविध विभागाचे कार्यालय तसेच सभापती, उपसभापती कक्ष, सभागृह आहेत. कार्यालय परिसरात, तसेच रोजगार हमी योजना कार्यालयाचे सभोवताल कचऱ्याचा विळखा पसरलेला आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत तसेच विविध संबंधित अधिकारी कार्यालय परिसरात आहेत. सभागृहात विविध विभागांचे बैठक तसेच कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामीण भागातील शिक्षक, सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शेतकरी, शेतमजूर व वृद्ध नागरिक रोज येत असतात. महाराष्ट्र शासन स्तरावरील पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार हमी, ग्रामीण पाणीपुरवठा, उमेद, अंगणवाडी व इतर अनेक पंचायत समिती परिसरात अधिकारी कार्यालय आहेत. कार्यालय परिसरात स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. तालुक्याचे पंचायत समितीने काही वर्षा पूर्वी असलेल्या बीडीओचा बंगला आता रोजगार हमी योजनाचे कार्यालयकरिता वापर सुरू केलेला आहे. या कार्यालय परिसरात सभोवताल मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून ठिकठिकाणी कागदांचा, प्लास्टिक, केरकचरा पडलेला दिसून येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात; परंतु पंचायत समितीच्या कार्यालयात स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. पंचायत समिती कार्यालय सभोवताल कचऱ्याचा विळखा दिसतो. कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कार्यालय परिसरात स्वच्छता राखावी, अशी मागणी आहे.