हुसकावून लावलेला वाघ लोकांच्या दिशेने परततो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:00 AM2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:39+5:30

भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आला. त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. पट्टेदार वाघ समोरून घटनास्थळावर जमलेल्या लोकांच्या दिशेने येत होता. घाबरगुंडी उडालेल्या लोकांनी  आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर थांबून जागीच बसला. 

When a chased tiger returns to the people ... | हुसकावून लावलेला वाघ लोकांच्या दिशेने परततो तेव्हा...

हुसकावून लावलेला वाघ लोकांच्या दिशेने परततो तेव्हा...

googlenewsNext

अजिंक्य वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : गाईची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला  लोकांनी हाकलून लावले. मात्र काहीच वेळात हा वाघ शिकार केलेल्या गाईवर ताव मारण्याकरिता परत घटनास्थळाकडे लोकांच्या दिशेने सरसावला. हे बघून लोकांची भंबेरी उडाली. अखेर लोकांनाच वाघाला पाहून पळ काढावा लागला. ही थरारक घटना बुधवारी दुपारी भटाळी गावालगत घडली.
भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आला. 
त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. पट्टेदार वाघ समोरून घटनास्थळावर जमलेल्या लोकांच्या दिशेने येत होता. घाबरगुंडी उडालेल्या लोकांनी  आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर थांबून जागीच बसला. 
वाघाने केलेल्या शिकारीवर ताव मारण्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी बघून वाघ अधिकच खवळलेल्या स्थितीत होता. त्याची एकटक नजर लोकांकडे व शिकारीवर खिळली होती. लोकांची गर्दी व झालेल्या आरडाओरड्यानंतरही वाघ माघारी परतला नाही. 
वाघाची आक्रमकता बघून गावकऱ्यांनी वेळ वाया न दवडता घटनास्थळावरून पळ काढला. ही एक पट्टेदार वाघीण असून या परिसरात तिचा वावर आहे. या घटनेमुळे भटाळी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वाघांच्या घटना वाढल्या आहेत.

 

Web Title: When a chased tiger returns to the people ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ