भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजुरा होते पारतंत्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:08+5:302021-08-15T04:29:08+5:30

राजुरा : भारत स्वतंत्र झाला संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. राजुरा तालुक्यात मात्र भयावह परिस्थिती होती. राजुरा तालुका पारतंत्र्यात ...

When India became independent, Rajura was in parochialism | भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजुरा होते पारतंत्र्यात

भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजुरा होते पारतंत्र्यात

googlenewsNext

राजुरा : भारत स्वतंत्र झाला संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. राजुरा तालुक्यात मात्र भयावह परिस्थिती होती. राजुरा तालुका पारतंत्र्यात होता. तब्बल १३ महिन्यांनंतर निजामाच्या राजवटीमधून स्वतंत्र झाला. १७ सप्टेंबर १९४८ला राजुरा स्वतंत्र झाला.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा या भागात हैदराबाद राज्यात रजाकारांचा आतंक सुरू होता. निजाम राज्यात १७ जिल्हे होते. यात कर्नाटकचे तीन, आताच्या तेलंगणाचे नऊ आणि मराठवाड्यातील पाच जिल्हे होते. रजाकारांचा सामना करण्यासाठी हैदराबाद राज्य काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. सतत १३ महिने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. नवाब उस्मान अली यांनी राष्ट्र संघाकडे धाव घेतली. १३ सप्टेंबरला गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सेनाप्रमुख जी. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राजुरामध्ये भारतीय सेना घुसल्या. चार दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर हैदराबाद सैन्यप्रमुख कासिम रजवी यांनी गुडघे टेकले आणि हैदराबाद भारतात विलीन झाले. १९४७ मध्ये राजुरा शहराची लोकसंख्या चार हजार होती. आज भारत ७५वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे. परंतु जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस राजुऱ्यासाठी अविस्मरणीय राहील. कारण भारत स्वतंत्र होऊनही राजुरा पारतंत्र्यात होते.

140821\img_20210814_103148.jpg

याचं पुलावरन भारतीय सेना राजुरा मध्ये घुसल्या

Web Title: When India became independent, Rajura was in parochialism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.