नदी काठावरील जोखमीच्या ८६ गावांचे संकट केव्हा टळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:06+5:302021-07-26T04:26:06+5:30

चंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या ...

When will the crisis of 86 risky villages along the river be averted? | नदी काठावरील जोखमीच्या ८६ गावांचे संकट केव्हा टळणार?

नदी काठावरील जोखमीच्या ८६ गावांचे संकट केव्हा टळणार?

Next

चंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या अतिजोखमीच्या पूरपीडित गावांसाठी राज्य सरकार नवीन पुनर्वसन धोरण तयार करणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचाही पुनर्वसन व पायाभूत सुविधांच्या यादीत समावेश होणार काय, असा सवाल गावकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ उपस्थित केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. पूरपीडित सर्वच गावांच्या पुनर्वसनाची आवश्यकता नाही, असे गावकऱ्यांचेच म्हणणे आहे. परंतु, पुरापासून बचाव करण्यासाठी पायाभूत सोईसुविधा मागील २० वर्षांच्या कालखंडात निर्माण होऊ शकल्या नाही. याची जबर किमत पूरपीडित गावांना मोजावी लागत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. घरांची पडझड होणे, पुरामुळे उभी पिके वाहून जाणे आणि हजारो हेक्टर शेतीची जमीन खरवडून निघणे या घटना आता दरवर्षीच घडू लागल्या आहेत, याबाबत गावकरी नाराज आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री जिल्ह्याचेच असल्याने राज्य शासनाकडून नवीन पुनर्वसन सर्वंकष धोरण तयार करताना जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचा प्राधान्याने विचार झाला तरच हे नैसर्गिक संकट टळू शकते, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

बॉक्स

जीवनवाहिनीचा सर्वाधिक फटका

वैनगंगा नदी ही विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांतून समुद्रसपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला ९८ किलोमीटरचा प्रवास करून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमधून वाहते. जीवनवाहिनी म्हणून ओळखणाऱ्या वैनगंगेला पूर आल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सर्वाधिक फटका बसतो.

बॉक्स

पूरबाधित गावांची तीन श्रेणी

मागील २० वर्षांत पूर आलेल्या गावांची यादी तयार करून स्थानांतरण, पुनर्वसन तसेच पायाभूत सुविधांबाबत नव्याने विचार केला जाणार आहे. या सर्वंकष पुनर्वसन धोरणासाठी जिल्हाधिकारी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अशा पूरबाधित गावांची यादी निश्चित करतील. त्यामध्ये अतिजोखमीची पहिल्या यादीत, मध्यम दुसऱ्या व कमी जोखमीच्या गावांची नावे तिसऱ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय पूरबाधित गावे

२०२०-६७

२०१३-८६

२००५-३५

एकूण १८८

तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या

चंद्रपूर १३

बल्लारपूर ०८

गोंडपिपरी ०८

वरोरा १०

भद्रावती ०९

ब्रह्मपुरी १३

सिंदेवाही २

राजुरा ०५

कोरपना १७

Web Title: When will the crisis of 86 risky villages along the river be averted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.