‘त्या’ सदनिका निर्लेखित कधी होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:58+5:302021-05-29T04:21:58+5:30
कोरपना : येथील बाजारवाडी परिसरात ३५ वर्षांपूर्वी शासकीय सदनिका बांधण्यात आल्या होत्या. मात्र त्या आता काळाच्या ओघात जीर्णावस्थेत पडल्या ...
कोरपना : येथील बाजारवाडी परिसरात ३५ वर्षांपूर्वी शासकीय सदनिका बांधण्यात आल्या होत्या. मात्र त्या आता काळाच्या ओघात जीर्णावस्थेत पडल्या आहेत. त्या पाडून नवीन सदनिका उभारण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
सुरुवातीला या सदनिकेत महसूल, पोलीस आदी विभागाचे कर्मचारी राहत होते. परंतु जसजशा या सदनिका पडायला सुरुवात झाली, तसे येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे हा परिसर ओस पडला आहे.
सद्यस्थितीत पोलीस, महसूल, कृषी कर्मचारी आदींना राहण्यासाठी हक्काच्या सदनिका नाहीत. त्यामुळे त्यांना किरायाच्या घरात राहावे लागते आहे. तेव्हा या स्थानी सुसज्ज शासकीय सदनिका उभारण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या ठिकाणी सदनिका उभ्या झाल्यास अनेक कर्मचाऱ्यांचे अपडाऊनही बंद होईल. त्यामुळे कार्यालयीन कामे वेळेत आणि गतिमान होतील.