कोच्ची-पाचगाव रस्ता केव्हा कात टाकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:42 AM2018-04-26T00:42:16+5:302018-04-26T00:42:16+5:30
राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे.
कोच्ची-पाचगाव हा रस्ता दुर्लक्षित आहे. या मार्गावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाचगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने नागरिकांना तिथे उपचारासाठी जावे लागते. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. पण, त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गावाकडे जाण्यासाठी दुसरा मजबूत मार्ग नाही. या मार्गावर शेकडो शेतकºयांची शेती असल्याने पावसाळ्यात अनेक कामे अडतात. शेतावर बैलजोडी नेणेही कठीण होते. स्मार्ट सीटीच्या नावावर शहरातील रस्ते चकाचक करताना कोच्ची येथील नागरिकांना गावाकडे जाण्यासाठी पावसाळ्यात यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे शहरांचा विकास करताना ग्रामीण भागाचाही विचार करणे गरजेचे आहे. पण, जि.प.चा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच कोच्ची-पाचगाव रस्त्याची दुरूस्ती करून समस्या सोडवावी, अशी मागणी उपसरपंच गोपाल जंबलवार, रूपेश गेडेकर, महेंद्र धोंगडे, शंकर पिपरे, सुभाष झाडे, रमेश जुलमे, वामन नमनकर, केशव झाडे आदींनी केली आहे.
सावलहिरा-शिवापूर परिसरातही संताप
कन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा शिवापूर ते राज्यसीमा तसेच सावलहिरा ते येल्लापूर या रस्तांची अवस्था अतिशय वाईट आहे. शिवापूरला जोेडणारा मार्ग तेलंगणा राज्य सीमेपासून गुळगुळीत झाला. पण, महाराष्ट्र हद्दीतील रस्ता जैसे-थे आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना २० किलोमीटर अतिरिक्त फेरा पडतो. यामध्ये वेळ वाया जाते. आर्थिक भुर्दंड बसतो. शिवापूर मांगलहिरा, थिप्पा, उमरहिरा, दुगार्डी आणि तेलंगणातील मांगरुड व पवनार आदी गावांसाठी हा रस्ता अत्यंत सोईचा व कमी अंतराचा आहे. सावलहिरा ते येल्लापूर या रस्त्याचेही तेच हाल झाले. वर्दळीच्या रस्त्यावर साधे मातीकाम करण्यात आले नाही. या मार्गाची दुरूस्ती केल्यास विकासाला चालना मिळू शकते. बहुतांश गावे आदिवासी व विकासापासून वंचित आहेत. बांधकाम विभागाने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.