रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:17+5:302021-09-25T04:29:17+5:30
कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून पॅसेंजर तसेच नियमित रेल्वे गाड्या बंद आहेत. आता कोरोना आटोक्यात आला आहे. लसीकरणालाही वेग ...
कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून पॅसेंजर तसेच नियमित रेल्वे गाड्या बंद आहेत. आता कोरोना आटोक्यात आला आहे. लसीकरणालाही वेग आला आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे पॅसेंजर तसेच इतर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर-वर्धा यासह इतरही ठिकाणी नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना दररोज प्रवास करण्यासाठी आरक्षणाचे तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक भार पडत आहे.
बाॅक्स
मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?
रेल्वे विभागाने काही राज्यांप्रमाणे मुंबईतही लोकल प्रवासासाठी दोन लस घेतलेल्यांना मासिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आम्हालाही ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची मागणी प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
बाॅक्स
सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वे
नवजीवन, संघमित्रा, दक्षिण, जीटी, तामिळनाडू, तेलंगणा, बंगलोर, निजामुद्दीन, दानापूर-सिकंदराबाद, केरला, विशाखापट्टणम-नवी दिल्ली, यशवंतपुरम-निजामुद्दीन.
कोट
रेल्वेने काही विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. मात्र अन्य झोनमध्ये पॅसेंजर सुरू आहेत. प्रवाशांना त्रास न देता पॅसेंजर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषत: रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे मासिक पासची सुविधाही रेल्वेने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- श्रीनिवास सुंचूवार
झेडआरयूसीसी, सदस्य