वडगावच्या नाल्या केव्हा वाहत्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:31+5:302021-08-20T04:32:31+5:30
चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महनागरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातीस नाल्या मात्र वाहत नाहीत. याकडे मनपाने लक्ष ...
चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महनागरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातीस नाल्या मात्र वाहत नाहीत. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.
सॅनिटायझरची विक्री घटली
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. अनेकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्के सॅनिटायझरची विक्री घटली असल्याची माहिती आहे.
कोविडमुक्त भागातील शाळा सुरू करा
पोंभुर्णा : शासन परिपत्रानुसार कोविड नियमाचे पालन करीत शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यातील इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत. याच पत्राच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविडमुक्त भागातील शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत हजबन, सचिव संदीप ढोबळे, सदस्य रमेश सातपुते यांनी केली आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ
गोवरी : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.