बस कुठे अडकली; आधीच कळणार; ॲप लॉचिंग लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:10+5:302021-08-23T04:30:10+5:30
बॉक्स बस कुठे आहे हे आधीच कळणार रेल्वे प्रमाणेच एसटीची लाईव्ह माहिती प्रवाशांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर बस ...
बॉक्स
बस कुठे आहे हे आधीच कळणार
रेल्वे प्रमाणेच एसटीची लाईव्ह माहिती प्रवाशांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर बस क्रमांकावरुनही लोकेशन कळणार आहे. या बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसविली जाणार आहे.
बॉक्स
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
१५ ऑगस्टपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव ही मोहीम सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना ही सोय मिळण्यास विलंब लागणार आहे. व्हीटीएस प्रणाली सुरुवात झाल्यास प्रवाशांना सोईचे होणार आहे. रेल्वेप्रमाणेच बसचेसुद्धा लोकेशन कळणार असल्याने प्रवशांना बसची प्रतीक्षा करण्यापासून मुक्ती मिळणार आहे.
बॉक्स
प्रवाशांची होणार सोय
व्हीटीएस प्रणालीमुळे बसेस कोणत्या मार्गाने जाणार, बस सुटण्याची वेळ, विलंब होणार असल्यास अपेक्षित वेळ आदी माहिती या ॲपद्धारे उलब्ध होणार आहे. बसचा रिअल टाईम कळणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
बॉक्स
चारही आगारातील बसना लागणार यंत्रणा
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, चिमूर, वरोरा, राजुरा ही आगार आहेत. तर ब्रह्मपुरी आगार हे गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट आहे. जिलचह्यातील चारही आगारातील बसना टप्पट्याने व्हीटीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. यासाठी विभागीय चमू आगारात येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर बसला यंत्रणा बसविण्यात येणार आहे.