मालकाचा जीव वाचविताना झिबलीने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:00 AM2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:00:53+5:30

आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला.

While saving the life of the owner, Zibli gave up his life | मालकाचा जीव वाचविताना झिबलीने सोडले प्राण

मालकाचा जीव वाचविताना झिबलीने सोडले प्राण

Next
ठळक मुद्देआकोला येथील घटना : श्वानाची नागाशी १५ मिनिटे झुंज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असल्याने धन्याप्रती आयुष्याच्या अखेरपर्यंत माणसाची सेवा करतो. तसाच प्रत्यय काल आला. मालकाचा जीव वाचवितांना झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली. झिबली नावानी प्रसिद्ध असलेल्या जिबलीच्या जाण्याने गाव हळहळले.
वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील भास्कर चवले यांच्याकडे एक कुत्री होती. त्यांनी बारा वर्षांपूर्वी ते पिल्लू आणले. त्यांचा मुलगा निखीलने त्या पिल्लाचे झिबली असे नामकरण केले. गावातीलच शामदेव उमरे यांच्या गणपत नावाच्या कुत्र्यासोबत राहून अनेक गुण झिबलीने अंगिकारले. अनेकदा झिबली आणि गणपतने रानडुकरांना पिटाळून लावले. सात-आठ वषार्पूर्वी दोघांनी मिळून एका रानडुकराचा फडशा पाडला होता. दोघांनी मिळून अनेकदा विषारी सापांना यमसदनी धाडले होते. गणपत आणि झिबलीची चांगली केमेस्ट्री जमली होती.
तीन वषार्पूर्वी गणपतचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यावेळी अक्षरश: झिबली नावाची कुत्री रडल्याची आठवण गजानन उमरे सांगतात. बुधवारी भास्कर चवले, त्यांची पत्नी शशिकला मुले अनिकेत आणि निखील शेतात काम करित होते. झिबली शेतात खेळत होती. तेवढ्यात सिताबाई उमरे यांच्या शेताकडून एक नाग आपल्या मालकाच्या दिशेने झिबलीला येतांना दिसला.
आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला.
काही वेळानी चवले कुटूंबियांना ही झटापट लक्षात आली. त्यामुळे हातचे काम टाकून ते सर्वच धावले. त्यावेळी झिबलीच्या तोंडात मृत नाग असल्याचे त्यांना दिसले. चवले परिवार झिबलीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना तिने आपले प्राण त्यागले.

Web Title: While saving the life of the owner, Zibli gave up his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.