लाच घेताना वीज निरीक्षकाला अटक
By admin | Published: November 29, 2014 11:18 PM2014-11-29T23:18:02+5:302014-11-29T23:18:02+5:30
बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडून २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महानगरपालिकेतील वीज निरीक्षक अशोक काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई शनिवारी
चंद्रपूर : बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडून २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महानगरपालिकेतील वीज निरीक्षक अशोक काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या करण्यात आली. रविवार, दि. ३० नोव्हेंबरला तो सेवानिवृत्त होणार होता.
चंद्रपूर महानगरपालिकेत २०१०-११ मध्ये वीज साहित्य तसेच वायरिंंगची देखभाल करण्याचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराने शहरातील पथदिव्यांची देखभाल करण्यासाठी २२ लाख ७१ हजार ४४ रुपयांचे काम केले. याचे देयके २०११ मध्ये वीज विभागाचे निरीक्षक अशोक काळे याच्याकडे सादर केले. मात्र तेव्हापासून देयके मंजूर करण्यात आले नाही. अनेक वेळा विनंती करूनही देयके देण्याचे टाळाटाळ करण्यात येत होती. दरम्यान बिल मंजूर करण्यासाठी निरीक्षक काळे याने एक लाख रुपयांची १ नोव्हेंबर रोजी मागणी केली. मात्र ही रक्कम देण्यास कंत्राटदाराने अमान्य केली. त्यानंतर २५ हजारामध्ये सौदा ठरला. याबाबत कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. (नगर प्रतिनिधी)