माणिकगडच्या जंगलात होते पांढऱ्या वाघाचे वास्तव्य ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:47+5:302020-12-17T04:52:47+5:30
कोरपना : माणिकगड च्या जंगलात आज वाघांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र एकेकाळी या जंगलात पांढऱ्या वाघाचे अस्तित्व होते याची ...
कोरपना : माणिकगड च्या जंगलात आज वाघांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र एकेकाळी या जंगलात पांढऱ्या वाघाचे अस्तित्व होते याची माहिती काराई - गोराई परिसर व टेकडी बाबतचा इतिहास पट उलघटताना सांगण्यात येणाऱ्या आख्यायिकेवरून होते आहे.मात्र याबाबत कुठलेही अधिकृत स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नाही. वा वनविभागाकडे तशी नोंद ही नाही.त्यामुळे पांढऱ्या वाघाचे अस्तित्व होते की नाही यावरचे गूढ कायम आहे.
अठराव्या शतकात भारतात जेमतेम ५० पांढरे वाघ होते अशी जुन्या गॅझेटियरमध्ये नोंद आहे. पांढरा वाघ हा बंगालच्या वाघाचा रंगद्रव्य आहे. आज घडीला ज्याची सुंदरबन प्रदेशातील मध्य प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिसा राज्यातील जंगलात वेळोवेळी नोंद केली जाते. अशा बंगाल च्या वाघाला काळ्या रंगाचे पट्टे असते.मात्र त्यात पांढरा किंवा जवळ पांढरा कोट असतो. भुतिया किंवा अमानवी शक्तीचे वाहक या लोकांच्या गैरसमजुतीमुळे पूर्वी या पांढऱ्या वाघांना जंगलातून शोधून शोधून संपवून टाकले. मुळातच निसर्गात जगण्यासाठी धडपडणाऱ्या या जीवांना गैरसमजामूळे अनेक जंगलातून नामशेष व्हायला वेळ लागली नाही. आज जे काही पांढरे वाघ आहेत सुंदरबन प्रदेश तसेच बऱ्याच झु पार्क मध्ये च असून जगण्याची तगण्याची धडपड करत आहे. पकडीगुद्दम धरणासमोर असलेल्या टेकडावर
आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले काराई - गोराई देवस्थान आहे. या ठिकाणी अवाढव्य असे मोठ मोठे एकजीव पाषाण आहे. त्याला ते धार्मिक मान्यतेनुसार पूर्वापार काळापासून पूजतात. दर तीन वर्षांनी या स्थानी पूजन केले जाते. त्यात परिसरातील ४५ गावातील नागरिक सहभाग घेतात. त्यामुळे धार्मिक दृष्टीने या स्थळाला महत्व आहे. याच टेकडीवर जंगल भागात पांढरा वाघ वास्तव्यास होता अशी जुने जाणते मंडळी कडून अख्यायिका ऐकावयास मिळते. माणिकगड चे जंगल हे ताडोबा जगलानंतर जिल्ह्यातील
सर्वात मोठे जंगल आहे. सदर जंगल पूर्वी घनदाट होते. त्यामुळे ही पांढरा वाघ नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय हा वाघ थंड भागात बहुतांश वास्तव्यास राहत असल्याने येथील निसर्ग रचना त्यासाठी पोषक असल्याने त्याचे वास्तव्य असावे असा निसर्ग तज्ञांचा मतप्रवाह आहे.
परिसराच्या विकासाची गरज
काराई गोराई देवस्थान हे कोरपना - जिवती हमरस्त्यावर लागलेल्या निसर्गरम्य व प्रेक्षणीय टेकडीवर आहे. मध्यंतरात येथे मोठी यात्रा सुद्धा भरायची. धार्मिक दृष्ट्या हे महत्वपूर्ण स्थान असल्याने या परिसराचा विकास साधन्यात यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा सचिव ओम प्रल्हाद पवार व नागरिकांकडून होते आहे.