चंद्रपूरच्या खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात?

By Admin | Published: May 13, 2014 11:23 PM2014-05-13T23:23:18+5:302014-05-13T23:23:18+5:30

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. आजघडीला सर्वांंचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

Who is the owner of Chandrapur MP? | चंद्रपूरच्या खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात?

चंद्रपूरच्या खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात?

googlenewsNext

अनेकश्‍वर मेश्राम - बल्लारपूर

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. आजघडीला सर्वांंचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. सट्टा बाजाराने अंदाज वतविणे सुरु केले आहे. मात्र काट्याच्या तिरंगी लढतीमुळे सट्टाबाजारही संभ्रमात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यासाठी १६ मेच्या निर्णयाची प्रतीक्षा सर्वांंनाच लागली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संजय देवतळे, भाजपाचे हंसराज अहीर व आपचे अँड. वामनरावच चटप यांच्यात काट्याची लढत असल्याचा अंदाज मतदारांनी वर्तविला आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी असे एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश चंद्रपूर लोकसभा मतदार संघात आहे. यातील चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे तर दोन विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत.

विशेष म्हणजे, चारपैकी दोन आमदारांना राज्याच्या मंत्रीमंडळात कबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. पर्यावरण मंत्री संजय देवतळे स्वत: लोकसभेचे उमेदवार म्हणून आहेत. वरकरणी काँग्रेसचा उमेदवाराला परिस्थिती अनुकूल वाटत असली तरी आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांनी त्यांच्या विजयात अडथळा आणल्याचे मतदारात चर्चा आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा आपल्याला मिळेल, असा कयास भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या कार्यकर्त्यांंना वाटत आहे.

यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघात ६३.२५ टक्के मतदान झाले.

एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदारांपैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. यामध्ये राजुरा येथील २ लाख ८८ हजार ३३९ पैकी १ लाख ९८ हजार ५८९ मतदान, चंद्रपुरात ३ लाख ४७ हजार ५0५ पैकी एक लाख ९0 हजार ४१५, बल्लारपूर येथील ३ लाख ३७१ पैकी १ लाख ८४ हजार१७0 मतदान, वरोरा येथे दोन लाख ७३ हजार १६७ मतदान, वणी येथे दोन लाख ६३ हजार १0४ पैकी एक लाख ७६ हजार ७८0 मतदान तर आर्णी विधानसभा मतदार संघात दोन लाख ८0 हजार १२९ मतदारांपैकी एक लाख ७८ हजार १८४ मतदारांनी मतदान केले आहे.

२00९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या १५ लाख ३६ हजार ३५२ इतकी होती. यापैकी ८ लाख ९७ हजार ६0६ मतदारांनी त्यावेळी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ५७ इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

परिणामी वाढलेल्या टक्केवारीने सट्टा बाजार चांगलाच संभ्रमात सापडला आहे.

भाजपाचे खासदार हंसराज अहीर चौथ्यांदा लोकसभेत जातील काय? राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविलेला विश्‍वास संजय देवतळे सार्थ ठरवतील काय? आणि मागील लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव यावर्षी निवडणुकीतून अँड. वामनराव चटप विजयात रुपांतर करतील काय? याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.

तीन उमेदवारांच्या काट्याच्या लढतीमुळे सट्टा बाजार संभ्रमात असल्याने सट्टा लागवडीचे प्रमाणही कमी असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Who is the owner of Chandrapur MP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.