बेवारस वाहनांचा मालक कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:00+5:302021-07-28T04:29:00+5:30
बल्लारपूर : रस्ते अडवून अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. अशा वाहनचालकांकडून वर्षभरात दंडही वसूल करण्यात ...
बल्लारपूर : रस्ते अडवून अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. अशा वाहनचालकांकडून वर्षभरात दंडही वसूल करण्यात आला. मात्र सरकारी डेपोच्या बाजूने दोन वर्षांपासून बेवारस पडलेल्या जीपचा मालक कोण आहे, ते वाहन हटविण्यात का येत नाही, हे कोडे न उलगडणारे आहे.
शहरात अशी अनेक वाहने आहेत. २४ तास रस्त्याच्या बाजूला आपलीच मालकी समजून वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस स्टेशनच्या आवारातही अशी वाहने पडून आहेत. तर मुख्य मार्गावर रस्त्याच्या बाजूने वाहन उभे ठेवून वाहतुकीची कोंडी करीत आहेत. शहरात गल्लीबोळात वाहनमालक रस्त्याच्या बाजूला वाहने उभी ठेवून रहदारीला अडचण निर्माण करीत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
कोट
दोन महिन्यांपासून पोलीस विभागातर्फे रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सुरू आहे. मार्ग मोकळा करण्यात येत आहे.
- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर