सर्वच प्रयोग सरपंचांवर कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:06+5:302020-12-22T04:27:06+5:30

चंद्रपूर : १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्यामुळे सरपंच ...

Why all the experiments on sarpanches? | सर्वच प्रयोग सरपंचांवर कशासाठी?

सर्वच प्रयोग सरपंचांवर कशासाठी?

googlenewsNext

चंद्रपूर : १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्यामुळे सरपंच पदाचे स्वप्न बघणाऱ्या अनेक उमेदवारांचे स्वप्नभंग होणार आहे. त्यामुळे यावेळी पॅनलला प्रत्येक जागाच निवडून आणणे गरजेचे आहे. नाही तर बहुमत एकाकडे आणि सरपंच पद दुसऱ्याकडे अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील काही वर्षांपासून सरपंच पदावर डोळा ठेवून तयारी करणाऱ्या पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे जो उमेदवार निवडून येईल, त्यालाच उभे करावे लागणार आहे.

आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पॅनलला मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, निवडणूक होऊन सरपंचपद दुसऱ्याबाजूने गेले तर अविश्वास ठराव आणण्याची धडपड भविष्यात अन्य उमेदवार करतील, हे मात्र नक्की. यामध्ये ग्रामविकास खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असतानाही सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्यामुळे उमेदवारांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे.

६२९जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक

अडचणीत होणार वाढ

निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार असल्यामुळे गावागावात अडचणीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सत्ता एकीकडे आणि बहुमत दुसरीकडे अशी अवस्था गावांची होतील, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

सरपंच परिषदेचे मत

ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. आरक्षण नसल्यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. सरपंच हा पांढरा उंदिर नाही. त्यामुळे केंद्रापासून तर ग्रामपंचायत पर्यंत अनेक निवडणू होत असतानाच प्रयोग केवळ सरपंच पदांवरच का? असा प्रश्न अखिल भारतीय सरपंच परिषदेने उपस्थित केला आहे.

--

कोट

निवडणुकीनंतर आरक्षण काढण्यात येणार आहे. यामध्ये एखाद्या गावात बहुमत असतानाही आरक्षण असलेला सरपंच पदाचा उमेदवार त्या पॅनलकडे नसेल तर बहुमत असतानाही सत्ता मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे सरपंचावर प्रयोग न करता अन्य निवडणुकीवर करावा आणि निवडणुकीपूर्वीच सरपंच पदाचा आरक्षण काढावे.

-पारस पिपंळशेंडे

जिल्हा संपर्क प्रमुख, अखिल भारतीय सरपंच संघटना

---

सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्यामुळे निवडणुकीनंतर गावागावात तंटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षणानुसार जर बहुमत असलेल्या पॅनलकडे उमेदवार नसेल तर सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.

छबुताई बोंडे

माजी सरपंच साखरवाही

---

आरक्षण काढण्यात न आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक लढवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करून सरपंच पदाचे आरक्षण काढणे गरजेचे आहे.

-अजुर्न पायपरे

माजी सरपंच चिंचोली खुर्द

Web Title: Why all the experiments on sarpanches?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.