फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:09+5:302021-09-04T04:33:09+5:30
बॉक्स सबसिडी किती मिळते हो भाऊ घरामध्ये आता सिलिंडरचा वापर वाढला असून या वर्षात तब्बल २०० रुपयांच्या जवळपास दरवाढ ...
बॉक्स
सबसिडी किती मिळते हो भाऊ
घरामध्ये आता सिलिंडरचा वापर वाढला असून या वर्षात तब्बल २०० रुपयांच्या जवळपास दरवाढ झाली आहे. मात्र, सिलिंडरवर मिळणार सबसिडी दिवसेंदिवस कमी होत आहे.
यंदा जानेवारी महिन्यांपासून ग्राहकांना केवळ ५० रुपयांच्या जवळपास नाममात्र सबसिडी मिळत आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात नियमित जमाही होत नसल्याची ओरड आहे.
बॉक्स
घरगुती सिलिंडरसोबतच १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचीही मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याही सिलिंडरच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यांमध्ये १ हजार ७६५ रुपयांत मिळणार सिलिंडर आता १ हजार ८५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरसुद्धा परवडेनासे झाले आहेत.
बॉक्स
महिन्याचे गणितच कोलमडले
पूर्वीच महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच प्रत्येक महिन्यात सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे चूल पेटविल्याशिवाय पर्याय नाही. सततच्या महागाईने घर चालविणे मोठे जिकिरीचे झाले आहे.
- प्रतीक्षा बेलसरे, गृहिणी
------
कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम पडला आहे. त्यातच महागाई पिच्छा सोडण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे घरखर्च करताना मोठी अडचण होत आहे. सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्याने अडचण जात आहे.
-पुजा राठोड, गृहिणी
बॉक्स
१ डिसेंबर १०० ७४६
१ जानेवारी ०० ७४६
१ फेब्रुवारी ०० ७४६
१ मार्च १०४ ८५०
१ एप्रिल ०७ ८५७
१ मे ०० ८५७
१ जून ०० ८५७
१ जुलै ०० ८८३
१ ऑगस्ट २५ ९०८
१ सप्टेंबर २५ ९३३