पॅसेेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:39+5:302021-08-18T04:33:39+5:30

चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. अद्यापही पॅसेंजर सुरूच झाली नाही. त्यातच ...

Why is the passenger train still 'locked'? | पॅसेेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का ?

पॅसेेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का ?

Next

चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. अद्यापही पॅसेंजर सुरूच झाली नाही. त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत असल्याने प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करून सामान्य प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून सध्या सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, यातून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे तसेच आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

बाॅक्स

सुरु असलेल्या विशेष ट्रेन

नवजीवन, संघमित्रा, दक्षिण, जीटी, तामिळनाडू, तेलंगणा, बंगलोर-निजामुद्दीन, दानापूर-सिकंदराबाद, केरला, विशाखापट्टम-नवी दिल्ली, यशवंतपूरम-निजामुद्दीन

बाॅक्स

बंद असलेल्या एक्सप्रेस

सेवाग्राम, जयंती जनता, नंदीग्राम, ताडोबा, आनंदवन

बाॅक्स

बंद असलेल्या पॅसेंजर

काजीपेठ-नागपूर

काजीपेठ-बल्लारपूर

बल्लारपूर-वर्धा

नागपूर-भुसावळ

चांदा फोर्ट- गोंदिया

--

रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना

कोट

बसने प्रवास करणे परवडणारे नाही. त्यामुळे पॅसेंजर हा प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आता मुंबईमध्ये लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे या पॅसेंजर सुरू करून सामान्य नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

-राजेंद्र मर्दाने

अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

-कोट

कोरोनामुळे ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशन ओस पडले आहे. जवळच्या ठिकाणी जायचे असल्यास प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे अतिरिक्त शुल्क लागत आहे. त्यामुळे पॅसेंजर ट्रेन सुरू करून सामान्य प्रवाशांचा शासनाने विचार करावा.

-राजू वांढरे,चंद्रपूर

------

कोट

रेल्वेच्या दक्षिण, पूर्व, मध्य रेल्वे पॅसेंजर त्या झोनमध्ये सुरू आहे. मात्र, नागपूर विभागामध्येच पॅसेंजर बंद ठेवून येथील प्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनसुद्धा गप्प आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नियमानुसार पॅसेंजर सुरू करून प्र‌वाशांचा आर्थिक आणि मानसिक त्रास वाचवावा. पॅसेंजर सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

-श्रीनिवास सुचूंवार

झेडआरयुसीसी सदस्य

मध्य रेल्वे

Web Title: Why is the passenger train still 'locked'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.