वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरी, मोबदला मिळणार एकाच वेळी

By admin | Published: June 19, 2016 12:49 AM2016-06-19T00:49:41+5:302016-06-19T00:49:41+5:30

जमीन संपादित करुन मोबदला दिल्यानंतर कोळसा उत्पादन सुरू करण्याचे वेकोलिचे धोरण आहे.

WikiLeaks project workers will get a job, and they will get reimbursed at the same time | वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरी, मोबदला मिळणार एकाच वेळी

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरी, मोबदला मिळणार एकाच वेळी

Next

प्रकल्पग्रस्तांना दिलासा : नागपूरच्या बैठकीत निर्णय
वरोरा : जमीन संपादित करुन मोबदला दिल्यानंतर कोळसा उत्पादन सुरू करण्याचे वेकोलिचे धोरण आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक महिने नोकरीकरिता प्रतीक्षा करावी लागत होती. आता या धोरणात वेकोलिने बदल केला असून नोकरी व मोबदला एकाच वेळी देण्याचे लेखी आश्वासन एकोना-१ खुली कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना दिले आहे.
वरोरा तालुक्यातील एकोना गावाच्या परिसरात वेकोलिच्या वतीने एकोना एक ही खुली कोळसा खाण सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एकोना, मार्डा, वनोजा, चरुर (खटी) आदी गावातील शेतकऱ्याच्या जमिनी कोळसा खाणीत जाणार आहेत. एकोना खुली कोळसा खाण एक करिता संपादित करण्यात आलेल्या जमिनीची नोटरी वेकोलिने शेतकऱ्याकडून काही महिन्यांपूर्वीच करुन घेतली. परंतु, शेतकऱ्यांना मोबदला व नोकरी देण्याच्या हालचाली वेकोलिच्या वतीने करण्यात आल्या नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वारंवार वेकोलि अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेरीस प्रकल्पग्रस्तांनी वेकोलिच्या कुचना कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वेकोलिच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तासोबत चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्पळ ठरली. त्यामुळे उपोषण सुरू ठेवले. यावर वेकोलिने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याकरिता नागपूर येथे सीएमडी यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांची बाजू आमदार बाळू धानोरकर यांनी मांडली. जमिनीचा मोबदला व नोकरी एकाच वेळी देण्याची आग्रही भूमिका त्यांनी घेतली. याकरिता वेकोलि प्रशासनान पाहिजे तितका वेळ देत असल्याचे बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. यावर वेकोलिने भारत सरकार कोयला मंत्रालयाकडून स्वीकृती प्रकल्पग्रस्तांना मोबदला ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले. या निर्णयानंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले उपोषण सोडले. वेकोलिच्या या निर्णयाने समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: WikiLeaks project workers will get a job, and they will get reimbursed at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.