ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवप्रेमींना करता येणार इंटर्नशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:56+5:302021-02-07T04:26:56+5:30

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार वन्यजीव संरक्षण व वनसंपदा संवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे वाघ व तृणभक्षी ...

Wildlife lovers can do internships at the Tadoba Tiger Reserve | ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवप्रेमींना करता येणार इंटर्नशिप

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवप्रेमींना करता येणार इंटर्नशिप

googlenewsNext

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार वन्यजीव संरक्षण व वनसंपदा संवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे वाघ व तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली. ताडोबा सफारीसाठी आले की वाघ पाहायला मिळणार, याची खात्री असते. याच कारणांमुळे देश-विदेशातील सिलिब्रिटींपासून सामान्य नागरिकही ताडाबाच्या सफारीसाठी येतात. पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन ताडोबा व्यवस्थापनाने मार्च ते जून २०२१ या कालावधीत वन्यजीवप्रेमींसाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करू दिली. इच्छुकांना २५ प्रेब्रुवारी २०२१ पर्यंत ताडोबाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे.

कुणाला मिळणार प्राधान्य ?

पर्यटन, बांधकाम, वास्तुरचना, सोशल मीडिया, माहिती- तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धन अशा पाच शाखांमध्ये इंटर्नशिप करण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय, कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची तयारी आदी अर्हता असणारेही याकरिता अर्ज सादर करू शकतात. इंटर्नशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ताडोबा व्याघ्र व्यवस्थापनाकडून अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

कोट

ही इंटर्नशिप पूर्णत: ऐच्छिक आहे. यासाठी कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. इंटर्नशिप करताना मिळालेल्या कौशल्याचा ताडोबा व्याघप्रकल्प व्यवस्थापनासाठी वापर करण्यात येणार आहे.

-डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर

Web Title: Wildlife lovers can do internships at the Tadoba Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.