भाजपाच्या इच्छाशक्तीने महापौरपदाची चुरस वाढणार

By admin | Published: October 25, 2014 10:36 PM2014-10-25T22:36:43+5:302014-10-25T22:36:43+5:30

केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत.

The will of the BJP will increase the will of the mayor | भाजपाच्या इच्छाशक्तीने महापौरपदाची चुरस वाढणार

भाजपाच्या इच्छाशक्तीने महापौरपदाची चुरस वाढणार

Next

काँग्रेस विभागली तीन गटात : पुगलिया-नागरकर यांचा गट एकत्र
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत. काँग्रेसमधील एका गटाला मदत करण्यापेक्षा असंतुष्टांच्या सहकार्याने आपलीच सत्ता स्थापण्याचे मनसुबे भाजपाच्या गोटात रचले जात असल्याने चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडणुकीत रंग भरला जाण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेत काँगे्रस हा सर्वात मोठा पक्ष आहे. २६ सदस्य या पक्षाकडे आहेत. त्या पाठोपाठ भाजपाकडे १८ सदस्य असल्याने या पक्षाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेस तीन गटात विभागली आहे. विद्यमान महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी वेगळी चुल मांडल्यापासून पक्षातील अंतर्गत वातावरण ताणाताणीचे झाले आहे. आपल्या गटाकडे १० ते १२ सदस्य असल्याचा या गटाचा दावा आहे.
माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे काँगे्रसच्या गटाची सर्व सुत्रे होती. मात्र रिलायन्स जीओच्या मुद्यावरून महापौरांचा गट वेगळा झाला. असे असले तरी नरेश पुगलिया यांनी मनपाच्या राजकारणातील आपली पकड घट्ट ठेवली आहे. १२ ते १५ सदस्य आपल्या गटाशी अद्यापही जुळून असल्याचा दावा या गटाकडून होत आहे.
तिसरा गट माजी स्थायी समिती सभापती आणि विद्यमान महानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचा आहे. माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया यांच्यासह पाच नगरसेवक या गटासोबत जुळून आहेत. काँग्रेस महानगर अध्यक्ष या नात्याने नागरकर यांची जबाबदारी मनपात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे ते स्वत: मनपाच्या राजकारणात सक्रिय असून नगरसेवक आहेत. त्यामुळे आपली कामगिरी त्यांना पक्षापुढे दाखवावीच लागणार आहे.
राजकारणातील बेरीज-वजाबाकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महापौर अमृतकर यांचा गट आणि भाजपा जवळ आले आहेत. अमृतकर गटाने राखी कंचर्लावार यांना भावी महापौर म्हणून पुढे केले आहे. भाजपानेही या नावावर सहमती दर्शवित या गटाला मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची मानसिकताहीे सत्तास्थापनेकडे झुकल्याने महापौरांचा गट अस्वस्थ झाला आहे.
दरम्यान, तडजोडीच्या राजकारणात नंदू नागरकर आणि नरेश पुगलिया यांचा गट बराच जवळ आला आहे. या गटाच्या आजवर किमान दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या असून एकत्रित येऊन महापौरपदाची निवडणूक लढण्याची रणनिती आखली आहे. या दोन्ही गटांचे मिळून १५ नगरसेवकांचे संख्याबळ जुळले आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महापौर गटातील नगरसेवकही आपल्या संपर्कात असल्याचा दावा या गटाकडून होत असल्याने पुगलिया- नागरकर गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या गटाने अद्याप आपला महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी सोमवारनंतर संयुक्त बैठकीतून महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: The will of the BJP will increase the will of the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.